नागपूर : वर्गखोलीत कुणीच नसल्याचे बघून एका शिक्षकाने चौथीच्या वर्गातील  विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. हा प्रकार समजल्यानंतर परिसरातील नागरिकांनी शाळेला घेराव घालून आरोपी शिक्षकाला चांगलेच चोपले.

जोना टिमोथी असे शिक्षकाचे नाव आहे. मंगळवारी पीडित मुलीच्या पोटात दुखत होते. तिने ही बाब आजीला सांगितली. आजी तिला डॉक्टरकडे घेऊन गेली. मुलीच्या वेगवेगळया वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांना धक्का बसला.   मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली. तिने सर्व सांगितले. डॉक्टरांनी आजीला माहिती दिली.  आजीने मुंबई येथे नोकरी   करणाऱ्या तिच्या आईवडिलांना फोनवरून माहिती दिली. ते दोघेही ताबडतोब नागपूरला आले व अन्य पालकांसह  मुख्याध्यापकाची भेट घेतली. आरोपीने चूक मान्य करताच पालकांनी त्याला शाळेतच चोपायला सुरुवात केली. अजनीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर यांनी तक्रार स्वीकारली व गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. शिक्षकाला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

अनेक मुलींना छळल्याचा संशय

जोना टिमोथी हा संगीत शिक्षक असून त्याने आतापर्यंत इतरही काही मुलींना असेच छळले असण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  आरोपी शिक्षकाची कसून चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सकाळी ११ वाजता शेकडो