कवडीमोल जमिनीची लाखो रुपयांना विक्री

नागपूर : अतिशय वेगाने वाढणारी सागवानाची झाडे लावून देण्याचे आमिष दाखवून कवडीमोल भावाची जमीन लाखो रुपयांना विकून पुण्यात गुंतवणूकदारांची फसवणूक के ल्यानंतर नवीन कं पनी स्थापन करून नागपुरातही  असाच प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

पुण्यात लँडसन रिअ‍ॅलिटी कंपनीचा प्रकल्प २०१४ मध्ये सुरू झाला. तेथील जमीन विकल्यानंतर कं पनी बंद करण्यात आली. आता ओटू बायोटेक या नावाने कंपनीने नागपूर-चंद्रपूर मार्गावर गोविंदपूर येथे सागवान झाडे लावून देण्याच्या अटीवर जमिनीची विक्री सुरू केली आहे. त्याची जाहिरात प्रसिद्धी माध्यम आणि समाजमाध्यमावर येत आहे. दरम्यान, पुण्यातील गुंतवणूकदारांनी या कंपनीचे संचालक योगेश बाबुराव कैकाडे आणि संजय बाबुराव कैकाडे यांच्याविरुद्ध पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. हे संचालक वेगवेगळ्या नावाने कंपनी स्थापन करतात. तसेच वेगाने वाढणारी सागवान झाडे लावून देणे, त्यांची १२ वर्षे देखभाल दुरुस्ती करणे आणि मोठी झाडे झाल्यानंतर त्यांच्या किंमतीच्या ८० टक्के वाटा गुंतवणूकदारांना आणि २० टक्के कंपनीकडे  राहील असे सांगून अत्यल्प किमतीची जमीन लाखो रुपयांना विकतात. संपूर्ण प्लॉट विकल्यानंतर कंपनीचे कार्यालय बंद केले जाते,   असा अनुभव पुणेकरांना आला आहे. हे संचालक आता असाच प्रकल्प घेऊन नागपुरात आले आहेत. पुण्यात लँडसन रिअ‍ॅलिटी कंपनीच्या नावाने वूड काऊन्टी नावाने प्रकल्प होता. नागपुरात ओटू बायोटेक कंपनीच्या नावाने हा व्यवसाय केला जात आहे, असा आरोप गुंतवणूकदारांचा आहे.

through online transactions, airline employee, defrauded, shil pahata area, thane
ठाणे : विमान कंपनीतील कर्मचाऱ्याची ३७ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
GE Aerospace going to Invest Rs 240 Crore in Pune Plant Expansion
विमान इंजिनची निर्मिती करणाऱ्या जीई एरोस्पेसची पुण्यात मोठी गुंतवणूक

सदर कंपनीकडे २७ शास्त्रज्ञ असल्याचे सांगितले जाते. त्यांनी संशोधन करून जेनेटिकली एन्जिनीअर्ड हायेटक सागवानीची झाडे विकसित केली आहे. ही सागवान झाडे एका वर्षांत २० फूट, आठ वर्षांत ८० फूट आणि १२ वर्षांत १०० फूट उंच वाढतात, असा दावा केला जातो. म्हणजे १२ वर्षांत कोटय़वधी रुपये एका झाडातून मिळतील, असे सांगितले जाते. त्यामुळे अगदी माळरानातील सुमारे दोन लाख रुपयांची १० हजार चौरस फूट जमीन १२ लाख रुपयांना विकली जाते. गुंतवणूकदारांच्या नावाने सात-बारा केला जातो. काहींना सात-बारा देखील दिला जात नाही. काही ठिकाणी झाडे लावली जातात, तर काही प्लॉटधारकांना एक-दोन महिन्यांनी झाडे लावून दिली जातील, असे सांगून वेळ मारून नेली जाते, असे या प्रकल्पात गुंतवणूक केलेल्सर शर्मिला नाबर म्हणाल्या.

यासंदर्भातआदित्य संजय कानेटकर नावाच्या व्यक्तीने लँडसन रिअ‍ॅलिटी कंपनीच्या संचालकांविरुद्ध पोलिसात तक्रार केली आहे. कशाळगाव, ता. मावळ, जि. पुणे, येथे सागाची झाडे लावून त्या झाडांची पूर्ण वाढ करून देण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे. २०१४ मध्ये सुमारे ११० गुंतवणूकदार या कंपनीच्या आमिषाला बळी पडले. त्यांना झाडे मिळालेली नाहीत. कवडीमोल जमीन लाखात पडली. त्यांच्या हातात फक्त ऑनलाईन मिळालेला सात-बारा आहे. आता संचालक कंपनी बंद करून पळून गेले आहेत. या कंपनीची कुठेही प्रयोगशाळा, त्यांचे शास्त्रज्ञ नाहीत, असेही शर्मिला नाबर म्हणाल्या.

आरोप फेटाळले

गुंतवणूकादारांनी देखभाल दुरुस्ती (मेंटनन्स) खर्च दिला नाही. कं पनीने ३ किलोमीटर पाईप लाईन टाकली. चार वर्षे सुरक्षारक्षक तैनात के ला. शिवाय दोनदा झाडे लावून दिली. गुंतवणूकदारांच्या नावाने भूखंड करून दिला, असा दावा करीत कं पनीचे संचालक संजय कै काडे यांनी फसवणुकीचे आरोप फेटाळला.  मात्र कं पनी का बंद के ली आणि शास्त्रज्ञाच्या चमूचे काय, असे विचारल्यावर त्यांनी जास्त बोलण्याचे टाळले.