02 March 2021

News Flash

गुंडाकडून चाकूच्या धाकावर भाडेकरू महिलेवर बलात्कार

नितीन गंगाधर टुले (४०, पवनपुत्रनगर) असे आरोपी घरमालकाचे नाव आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर : गुंड प्रवृत्तीच्या घरमालकाने चाकूच्या धाकावर भाडेकरू महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत पवनपुत्रनगर येथे उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

नितीन गंगाधर टुले (४०, पवनपुत्रनगर) असे आरोपी घरमालकाचे नाव आहे. पीडित २६ वर्षीय महिलेचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले. पती बांधकाम कारागीर असून ते आरोपीच्या घरी भाडय़ाने राहात होते. राहायला आल्यापासून नितीनची तिच्यावर वाईट नजर होती. तो तिच्याशी विनाकारण बोलण्याचा प्रयत्न करीत होता. ती त्याला दाद देत नव्हती. २ ऑक्टोबरच्या रात्री तिचा पती घराबाहेर असताना त्याने घरातील दिवे बंद करून चाकूच्या धाकावर तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिने पतीला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. नितीनवर यापूर्वीचेच दोन खुनाचे गुन्हे दाखल असून तो गुंड प्रवृत्तीचा आहे. पीडित महिला घाबरली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने पतीला घर खाली करण्याची विनंती केली. पतीने घर रिकामे करण्याचे कारण विचारले असता ती काहीच सांगत नव्हती. शेवटी पतीने नवीन घर शोधून राहते घर खाली करण्यास नकार दिला असता तिने आदल्या रात्री घडलेली सर्व हकिगत सांगितली. त्यानंतर पती व पत्नीने पोलीस ठाणे गाठून पोलिसांत तक्रार दिली. हुडकेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. न्यायदंडाधिकाऱ्यांनी  त्याची रवानगी कारागृहात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 12:06 am

Web Title: tenant woman rape on knifepoint by criminal zws 70
Next Stories
1 पुण्यासाठी ११ ऑक्टोबरपासून रेल्वेगाडय़ा
2 ‘माझे कुटुंब’चे वेगवान सर्वेक्षण! 
3 करोनामुक्तांच्या तुलनेत बाधित पुन्हा वाढले
Just Now!
X