महेश बोकडे

आमदार, खासदार अन् लोकसभेच्या नावाने मिळते थाळी

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच उपराजधानीतील हॉटेल व्यावसायिकांनाही राजकीय ज्वर चढला आहे. शहरातील चार हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी थाळ्यांना लोकसभा-राज्यसभासह खासदार आणि आमदार अशी आगळीवेगळी नावे दिली आहेत. विशेष म्हणजे, नावानुसार या थाळ्यांचा आकार आणि त्यातील पदार्थाची निवड ठरवली जात आहे.

उपराजधानीत हा आगळावेगळा उपक्रम राबवणाऱ्यांमध्ये वर्धा रोडवरील कर्वेनगर येथील कुक्कुज फॅमिली रेस्ट्रॉरेंट, स्वावलंबी नगरातील बीईंग फुडीज फॅमिली रेस्टॉरेंटचा समावेश आहे. कुक्कुज (पान १वरून) लोकसभा, राज्यसभा, महानगरपालिका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत अशी वेगवेळी नावे दिली गेली आहेत. लोकसभा ही सर्वात मोठी थाळी असून त्यात सव्वा किलो चिकन, मटण, अंडी, मासोळींपासून तयार विविध मांसाहारी पदार्थ असतात. ही थाळी आठ ते नऊ जण खाऊ शकतात. राज्यसभा थाळीत ४ ते ५ जण खाऊ शकतील असे विविध मांसाहारी पदार्थ असतात. महानगरपालिका थाळीत दोन जण तर ग्रामसेवक, ग्रामपंचायत थाळीत एक व्यक्ती भरपेट खाऊ शकेल असे पदार्थ असतात. बीईंग फुडीज रेस्टॉरेंटमध्ये थाळींना खासदार, आमदार, महापौर थाळी अशी नावे देण्यात आली आहेत. खासदार थाळीत चार व्यक्ती खाऊ शकतील असे २७ ते २८ पद्धतीचे मांसाहारी पदार्थ असतात. आमदार थाळीत चार व्यक्ती खाऊ शकतील असे शाकाहारी पदार्थ तर महापौर थाळीत सहा व्यक्ती खाऊ शकतील असे मांसाहारी आणि शाकाहारी खाद्यपदार्थाचे मिश्रन आहे. कुक्कुज फॅमिली सेस्टॉरेंट हे अमित जाधव, विवेक वाघमारे, रोहित कांबळे यांच्या तर बीईंग फुडीज रेस्टॉरेंट हे हर्षल रामटेके आणि कुशल अणे यांच्या मालकीचा आहे.

थाळी संपवा, बक्षीस मिळवा

कुक्कुज रेस्टॉरेंटमध्ये खासदार थाळी एकाच व्यक्तीने खाऊन दाखवल्यास त्याला ११,१११ रुपयांचे बक्षीस देण्याची तर दोघांनी ही थाळी संपवल्यास त्याच्याकडून कोणतेही शुल्क न घेण्याची हॉटेल संचालकांकडून घोषणा करण्यात आली आहे. बीईंग फुडीज रेस्टॉरेंटनेही त्यांची तीनपैकी कोणतीही थाळी १४ मिनिटांमध्ये संपवून दाखवल्यास त्यांच्याकडून कोणतेही शुल्क न आकारण्याची घोषणा केली आहे.

दैनंदिनी

* जनआक्रोश – सातवा वार्षिक समारोह, प्रमुख अतिथी : विजय फणशीकर, विशेष अतिथी : प्रदीप दादा रावत, इंडियन मेडिकल असोसिएशन, डॉ. हरदास सभागृह, उत्तर अंबाझरी मार्ग, सायंकाळी ५ वाजता.

कुक्कुज रेस्टॉरेंटमध्ये लोकसभा निवडणकीनंतर काही महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला डोळयासमोर ठेवून नवीन थाळीसाठीचे नियोजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

– विवेक वाघमारे, कुक्कुज रेस्टॉरेंट.

नागपूरकरांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खायला आवडतात. त्यातच हल्ली कुटुंबासह हॉटेलमध्ये विविध खाद्यपदार्थ खाण्याचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे बीईंग फुडीजमध्ये ग्राहकांच्या पसंतीवर भर देऊन त्यांना आवडेल असे पदार्थ देण्याचा प्रयत्न केला जातो.

– हर्षल रामटेके, बीईंग फुडीज रेस्टॉरेंट.

मोठी थाळी उचलायला दोन वेटर लागतात

दोन्ही रेस्टॉरेंटमध्ये लोकसभा आणि महापौर थाळीत सर्वाधिक अन्नपदार्थ असतात. ती उचलून ग्राहकांना वाढण्यासाठी चक्क दोन वेटर लागतात. ही वाढण्याची पद्धतही  ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र असते.