नागपूर : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्ह्य़ात व शहरातील विविध भागात निषेध आंदोलन करण्यात आले.

टिळक पुतळ्याजवळील पक्षाच्या कार्यालयासमोर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांच्या उपस्थितीत नेत्यांनी  काळ्या फिती लावून प. बंगालमधील हिंसाचाराचा निषेध के ला.   निवडणुकीनंतर भारतीय पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करणे, कार्यकर्त्यांना मारहाण व हत्या करण्याचे प्रकार निंदनीय आहे. अशा घटनांमुळे लोकशाहीवर संकट आले असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार विकास कुंभारे, अर्चना डेहनकर उपस्थित होत्या. शहीद चौकात आमदार गिरीश व्यास, दक्षिण नागपुरात देवेंद्र दस्तुरे, टेलिफोन चौकात आमदार कृष्णा खोपडे, उत्तर नागपुरात विकी कुकरेजा, संजय चौधरी, अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम, संदीप जाधव, दक्षिण पश्चिम मतदरसंघात किशोर वानखेडे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले.

पुरोगामी गप्प का? – फडणवीस

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आले. हे भयानक आहे. मात्र स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे नेते या घटनेचा साधा निषेध करीत नाही. हिंसाचाराला त्यांचे समर्थन आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  के ला. बंगालमध्ये राज्य सरकार पुरस्कृत दहशतवाद आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला होत आहे. राज्यातील जे नेते ममता बॅनर्जी यांच्या विजयाचे कौतुक करीत आहे ते बंगालमधील हिंसाचारावर काहीच बोलत नाही. स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे काही पत्रकारही गप्प आहेत. केंद्रीय नेतृत्वाने परवानगी दिल्यास महाराष्ट्र भाजपतर्फे  बंगालमधील ज्या भाजप कार्यकर्त्यांची घरे पाडण्यात आली ते बांधून देईल तसेच त्यांना सुरक्षा सुद्धा देऊ. बंगालच्या कार्यकर्त्यांसोबत आणि त्यांच्या सघर्षांत भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता सोबत असल्याचे त्यांनी सांगितले

फडणवीसांना करोनाग्रस्तांची होरपळ दिसत नाही का?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्राणवायूच्या कमतरतेमुळे होणारे मृत्यू, रेमडेसिविर इंजेक्शन तुटवडय़ामुळे महिला, मुलांची होणारी होरपळ आणि त्यांचा होणारा आक्रोश दिसत नाही का, असा सवाल काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी आशीष दुवा यांनी के ला. बंगालमधील हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो, परंतु करोना संक टात भाजपचे योगदान काय तर के वळ  राजकारण हे  फडणवीस यांनी दाखवून दिले आहे. माणूस आणि त्याचे जीवन त्यांच्यासाठी दुय्यम आहे, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, कर्नाटकमध्ये प्राणवायूचा तुटवडय़ामुळे लोक मरत आहेत.  स्मशानभूमी आणि कब्रस्तानचे राजकारण करणाऱ्यांनी धार्मिक तेढ निर्माण करून व  ज्याची या देशाला आवश्यकता आहे ते प्राणवायू न देऊन जीवन जगण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले, अशी टीकाही त्यांनी के ली.

आंदोलन करताना देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे व इतर पदाधिकारी.