नागपूर :  स्वच्छ पाणी देण्याच्या उद्देशाने ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सने वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरू केली असून त्या मोहिमेंतर्गत १८ते २१ डिसेंबर दरम्यान नेहरूनगर झोनमधील सर्व जलकुंभांची स्वच्छता होणार आहे. त्यामुळे या काळात टप्प्याटप्प्याने संबंधित जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. या बंदच्या काळात टँकरची सुविधा मिळणार नाही.

सक्करदरा ३ जलकुंभ स्वच्छतेमुळे १८ डिसेंबरला रुक्मिणीनगर, गुरुदेव नगर, श्रीरामनगर, संजय गांधी नगर,  सक्करदरा २ जलकुंभ स्वच्छतेमुळे १९ डिसेंबरला महालक्ष्मी नगर, श्रीनगर, लाडीकर लेआऊट, जवाहरनगर, जुना सुभेदार लेआऊट, सुर्वे लेआऊट व सक्करदरा २ जलकुंभ स्वच्छतेमुळे २१ डिसेंबरला  आशीर्वाद नगर, बँक कॉलोनी, भांडे प्लॉट, सेवादल नगर, सोलंकीवाडी, जुना सक्करदरा, राणी भोसले नगर, सोनगारी नगर येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. स्वच्छतेच्या कामामुळे त्या त्या जलकुंभावर अवलंबून असलेल्या भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील. यादरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होऊ  शकणार नसल्याने नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या जलप्रदाय विभाग व ओसीडब्ल्यूने केले आहे.

गोधनी पेंच ४ जलशुद्धीकरण केंद्र वीज मंडळाकडून देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे तेथील वीजपुरवठा बंद केला जाणार आहे. त्यामुळे १९ डिसेंबरला या कामामुळे आशीनगर, लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर व नेहरूनगर झोनमधील ८ जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहील. नारा नारी, जरीपटका (आशीनगर झोन), धंतोली (धरमपेठ झोन), लक्ष्मीनगर (लक्ष्मीनगर झोन), नालंदा नगर, श्री नगर, ओंकार नगर जुने, नवे, म्हाळगी नगर (हनुमान नगर झोन), हुडकेश्वर व नरसाळा गाव येथील जलकुंभावरुन होणारा पाणीपुरवठा बंद राहील त्यामुळे नागरिकांनी आधीच पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन ओसीडब्ल्यूने केले आहे.