News Flash

सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग

इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली.

संगणकाच्या काळात सुंदर हस्ताक्षराकडे होत असलेले विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष बघता रामन विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अक्षरभूषण मधुकर भाकरे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रामन विज्ञान केंद्राच्या परिसरात सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेमध्ये १३० शाळांमधील पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले.

गेल्या पंधरा वर्षांपासून ही स्पर्धा आयोजित केली जात असून दरवर्षी या स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. आमदार सुधाकर कोहळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी रामन विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक रामदास अय्यर, शिक्षणाधिकारी विलास चौधरी, भेलावे, संजय भाकरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासात सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व असल्याचे कोहळे म्हणाले. पाहुण्यांचे स्वागत अभय भाकरे यांनी केले. अजय भाकरे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.  इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभ २५ डिसेंबरला सकाळी ९.३० वाजता शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात होणार आहे. विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके, स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्रे देण्यात येतील. कार्यक्रमाला अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, महापौर नंदा जिचकार, शिक्षक आमदार नागो गाणार, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 12:03 am

Web Title: thousands of students participate in the beautiful signature competition
Next Stories
1 विदर्भाच्या अनुशेषावर राज्यपालांच्या शिफारशींकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष
2 फडणवीस व गडकरी चिमुरडय़ांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देतात तेव्हा..
3 वर्ध्यात इन्स्टाग्राम पोस्टवरुन मित्राची हत्या
Just Now!
X