नागपूर जिल्ह्य़ातील सावनेर तालुक्यातील घटना

नागपूर : हिंगणघाटमध्ये एका प्राध्यापिकेला जाळून ठार मारण्याची घटना ताजी असतानाच आता नागपूर जिल्ह्य़ातील सावनेरच्या पहिलेपार येथे एका माथेफिरू तरुणाने ‘मेडिकल रुग्णालया’तील एका डॉक्टर साहाय्यक प्राध्यापिकेसह इतर दोन महिलांवर अ‍ॅसिड फेकले. त्यात डॉक्टरसह इतर दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. उपस्थितांनी आरोपीला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. ही घटना आज गुरुवारी दुपारी घडली.

seven houses were burn in fire due to explosion of gas cylinder
जामनेर तालुक्यातील आगीत सात घरे भस्मसात, गॅस सिलिंडरच्या स्फोटाने गाव हादरलेन
Gutkha worth six and a half lakh seized in Dindori taluka
दिंडोरी तालुक्यात साडेसहा लाखाचा गुटखा जप्त
Fire Breaks Out at Atharva Agrotech Industry Project in Buldhana near khamgaon midc
खामगाव ‘एमआयडीसी’तील ‘अथर्व ॲग्रोटेक’ला भीषण आग, लाखोंची हानी
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू

नीलेश कन्हेरे (२२) असे आरोपीचे नाव आहे. पीडिता नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सामाजिक रोगप्रतिबंधकशास्त्र विभागात कंत्राटी साहाय्यक प्राध्यापिका आहे. ती एका प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी सावनेरला गेली होती. तिच्या मदतीला दोन निवासी डॉक्टरसह इतर कर्मचारी होते. सर्वेक्षण करीत असताना नीलेशने आधी डॉक्टरांच्या वाहनावर अ‍ॅसिड टाकले. त्यानंतर तो पीडित प्राध्यापिकेच्या जवळ आला. त्याने तिच्या चेहऱ्याच्या दिशेने अ‍ॅसिड भिरकावले. यात दोघांना किरकोळ जखम झाली. त्यानंतर पुन्हा आरोपीने पुढे एका   १४ वर्षीय मुलीच्या गळ्यावर अ‍ॅसिड फेकल्याने तिही जखमी झाली. हा प्रकार बघून उपस्थितांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीला शिक्षेची मागणी करत उपस्थितांनी पोलीस ठाण्यात काही वेळ गोंधळ घातला.

दुसऱ्या तरुणीवर अ‍ॅसिड टाकायचे होते?

उपस्थित डॉक्टरांनी पोलिसांत तक्रारीसाठी सावनेर पोलीस ठाणे गाठले. येथे आरोपीने त्यांच्यापुढे मद्याच्या नशेत  दुसऱ्या तरुणीवर अ‍ॅसिड टाकायचे असल्याचे सांगितले. परंतु वारंवार तो आपला जवाब बदलत असल्याने  शुद्धीवर आल्यावरच त्याने हे कृत्य का केले, हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 ‘‘मेडिकलची सहाय्यक प्राध्यापिका प्रथमच सावनेरला सर्वेक्षणासाठी गेली होती. या घटनेमुळे डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. समाजाने असला प्रकार दिसताच वेळीच आरोपीला रोखून महिलांना वाचवण्याची गरज आहे. या घटनेत उपस्थितांनी प्राध्यापिकेला मदत केली. आता पोलिसांनी दोषीवर कठोर कारवाई करायला हवी.’’

– डॉ. अविनाश गावंडे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण संघटना.