News Flash

नागपूरजवळ टिप्पर-एसटी आणि कारचा विचित्र अपघात

अपघाताबाबत अजून विस्तृत माहिती समजू शकलेली नाही.

नागपूर-भंडारा रस्त्यावर डांबर घेऊन जात असलेला टिप्पर (एमएच ३१ सीबी ४१९) रस्त्याच्या मधोमध उभा होता.

नागपूर येथे बंद अवस्थेत रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परला भरधाव एसटीने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात काही प्रवासी ठार झाल्याचे सांगण्यात येते. मृतांचा आकडा आणि अपघाताबाबत अजून विस्तृत माहिती समजू शकलेली नाही. हा अपघात आज (रविवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास नागपूर-भंडारा बायपासवरील कढोली येथे घडली. या विचित्र अपघातात एका कारनेही बसला धडक दिली.

नागपूर-भंडारा रस्त्यावर डांबर घेऊन जात असलेला टिप्पर (एमएच ३१ सीबी ४१९) रस्त्याच्या मधोमध उभा होता. त्याचवेळी भंडाराकडे भरधाव येत असलेल्या एसटीने (एमएच ४० ८९९५) मागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात किती जण मृत पावले वा जखमी झाले हे समजू शकले नव्हते. त्याचवेळी एसटीच्या मागे येत असलेल्या कारने (एमएच ४९ एएस १४६१) धडक दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 3:46 pm

Web Title: tipper st and car accident near nagpur
Next Stories
1 भारतात वैद्यकीय पर्यटनाची प्रचंड क्षमता
2 मनोरुग्णांच्या जीवनात हास्य फुलवणारे ‘स्माईल प्लस’
3 राज्यात सडक्या सुपारीची तस्करी
Just Now!
X