News Flash

आदिवासी महिला कलावंताला पैसे परत देण्याचे आदेश

‘लोकसत्ता’ ने १९ मे रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित के ल्यानंतर विभागाकडून ही पावले उचलण्यात आली.

‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

नागपूर : आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनातून अनुसूचित जमातीच्या महिला कलावंतांच्या सुमारे आठ लाख रुपये किं मतीच्या कलाकृती गहाळ झाल्यानंतर  तब्बल तीन वर्षांनी या कलाकृतीचा मोबदला देण्याची उपरती आदिवासी विभागाला झाली आहे. पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेला त्यांनी तसे निर्देश दिले आहेत. ‘लोकसत्ता’ ने १९ मे रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित के ल्यानंतर विभागाकडून ही पावले उचलण्यात आली.

मलेशियातील क्वालालंपूर येथे नऊ ते १७ जून २०१८ या कालावधीत आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनासाठी आदिवासी विकास विभागाने २५ व्यावसायिक कलाकृ ती घेतल्या होत्या. अमरावती स्थित अनुसूचित जमातीच्या पारधी जमातीतील महिला कलावंत स्वप्ना पवार यांच्या त्या कलाकृ ती होत्या. त्याची किं मत सात लाख ९० हजार रुपये इतकी आहे. विकलेल्या कलाकृ तींचा मोबदला श्रीमती पवार यांना मिळणे स्वाभाविक असून उर्वरित कलाकृ ती प्रदर्शनानंतर विभागाने चांगल्या स्थितीत परत करणे अपेक्षित होते. मात्र, विभागाच्या हलगर्जीपणामुळे या कलाकृ ती गहाळ झाल्या. श्रीमती पवार यांनी २० नोव्हेंबर २०१८ ला विभागाला याबाबत अवगत के ले. तेव्हापासून सलग त्या विभागाकडे हेलपाटा घालत होत्या. विभागाने त्याची दखलच घेतली नाही आणि त्यामुळे ही महिला कलावंत आर्थिक अडचणीत सापडली. लोकसत्ताने १९ मे रोजी वृत्त प्रकाशित के ल्यानंतर आदिवासी विभागाने याबाबत शोधाशोध सुरू के ली. दरम्यान, आदिवासी विकास विभागाने   पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेला याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, संस्थेने कार्यवाहीबाबत हलगर्जीपणा के ल्याचे विभागाने काढलेल्या पत्रात स्पष्ट झाले आहे. विभागाने २० नोव्हेंबर २०१८ ला सर्व कलाकारांसोबत बैठक आयोजित के ली होती. या बैठकीत कलाकृ ती गहाळ झालेल्या कलाकारांना नुकसान भरपाई देण्याच्या उद्देशाने पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेला १३ डिसेंबर २०१८ ला पत्र दिले होते. २९ जानेवारी २०१९ ला पुन्हा एका पत्रान्वये आठवण करून देण्यात आली. मात्र, त्यानंतरही पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने कार्यवाही के ली नाही, असेही या पत्रात नमूद आहे. आता पुन्हा एकदा विभागाने आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेला कलावंतांना त्यांच्या गहाळ झालेल्या कलाकृ तीचा मोबदला केंद्रीय सहाय्य निधीतून उपलब्ध करून द्यावा. तसेच के लेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे संस्था हा मोबदला देणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनात ज्या ज्या कलावंतांच्या कलाकृ ती गहाळ झाल्या, त्याचा मोबदला देण्यात विभागाने तीन वर्षे खर्ची घातली आहेत. विभागाने हा निधी त्या कलावंतांच्या खात्यात जमा करायला हवा. ज्या कं पनीमुळे या कलाकृ ती गहाळ झाल्या त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. शासनाने या कं पन्यांना काळ्या यादीत टाकावे.

– राजेंद्र मरसकोल्हे, अध्यक्ष, आफ्रोट संघटना.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2021 2:21 am

Web Title: tribal department order to return money to adivasi female artists zws 70
Next Stories
1 राज्य सरकारकडून विदर्भाला सापत्न वागणूक
2 घरकूल योजनेचे लाभार्थी मनरेगाच्या अनुदानापासून वंचित
3 ओबीसींचा विश्वासघात थांबवा, अन्यथा उग्र आंदोलन!
Just Now!
X