03 August 2020

News Flash

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठी गऱ्हाणे निवारण समिती स्थापन

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गऱ्हाणे निवारण समिती स्थापन केली आहे.

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गऱ्हाणे निवारण समिती स्थापन केली आहे. ही एक सदस्यीय समिती असून त्याचे अध्यक्ष सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुरेंद्रकुमार जहागीरदार राहतील. १६ मे रोजी प्रकल्पाच्या तक्रारीचा आढावा घेण्यासाठी बावनकुळे यांनी बैठक घेतली होती व त्यात ही समिती नियुक्त करण्याचे संकेत दिले होते. त्याची पूर्तता करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींचे निवारण करून प्रकल्प पूर्ण करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. राष्ट्रीय पुनर्वसन धोरण २००७ नुसार विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करण्यात आले होते. पॅकेज रक्कम वाटप करताना काही वाद निर्माण झाले आहेत. या वादाचे निराकरण न्यायालयाव्दारे करणे शक्य नसल्याने ते कायम आहेत परिणामी रक्कम वाटप होणे बाकी आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे स्थानांतरण थांबले आहे. त्यामुळे या तक्रारींचा एकदा निपटारा करायचा म्हणून यापूर्वी एक समिती स्थापन करण्यात आली होती. तिचा कार्यकाळ १५ जानेवारीला संपला होता. प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव कुटुंबाचा वाद सोडवण्यासाठी नव्याने गऱ्हाणे निवारण समिती स्थापन करण्यात आली. समितीपुढे प्रकल्पग्रस्तांची वादग्रस्त प्रकरणे येणार असून त्यावर तात्काळ मार्ग काढण्याचा प्रयत्न केले जाणार आहेत. वाढीव कुटुंबांना नोकरीऐवजी २ लाख ९० हजार रुपये एकमुस्त रक्कम देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्याचे वाटप सुरू आहे.

गावठाणातील सुविधांची तपासणी
प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर पर्यायी गावठाणात करण्यात येणार आहे. तेथील नागरी सुविधांची तपासणी करण्याचे आदेश जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पंचायत समिती कुही, भिवापूर व मौदा येथील गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. हे अधिकारी ३४ गावठाणांना भेटी देऊन तेथील नागरी सुविधांची पाहणी करतील व अहवाल सादर करतील. प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता यांचाही दौरा सुरू झाला आहे. त्यांनी भिवापूर तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. २३ मे रोजी ते कुही तालुक्यातील गावांना भेटी देणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2016 2:47 am

Web Title: troubleshooting committee established in nagpur
Next Stories
1 गुंडांच्या छेडछाडीमुळे शाळकरी मुलीची आत्महत्या
2 नागपूर ४६.६ अंश
3 जैवविविधता संकेतस्थळाला अजूनही मराठीचे वावडे
Just Now!
X