News Flash

वाझे यांच्या पत्रातील सत्य समोर येणे गरजेचे : फडणवीस

या पत्रात ज्या नेत्यांची नावे आली आहेत त्यांनी खुलासे केले असले तरी त्यातील खरे काय हे  समोर येणे गरजेचे आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सचिन वाझे याच्या पत्रात दोन कोटी आणि ५० कोटींचा उल्लेख आहे. हे प्रकरण गंभीर आहे. त्याची सीबीआय किंवा तत्सम संस्थेकडून चौकशी होऊन या प्रकरणातील सत्य  बाहेर यायला हवे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

या पत्रात ज्या नेत्यांची नावे आली आहेत त्यांनी खुलासे केले असले तरी त्यातील खरे काय हे  समोर येणे गरजेचे आहे. सीबीआयने याची चौकशी करत या प्रकरणात दूध का दूध, पाणी का पाणी केले पाहिजे. वाझेने दिलेले पत्र हे माध्यमाकडे आहे. जे काही त्या पत्रात लिहिण्यात आले आहे आणि ज्यांची नावे त्यात आहेत त्या गोष्टी  विचार करायला लावणाऱ्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रतिमेच्या दृष्टीने हे चांगले नाही. हे पत्र  उच्च न्यायालयाकडे देण्यात आल्यानंतर जबाब नोंदवले जातील. या सर्व प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली असून ती  कधीच ठीक होऊ शकणार नाही असेही फडणवीस म्हणाले. उच्च न्यायालयाने आधीच स्पष्ट निर्देश दिले होते. न्यायालयाची आजची टिपणी अत्यंत महत्त्वाची आहे. खरे पाहिले तर महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयात जायची गरज नव्हती, असेही फडणवीस म्हणाले.

‘माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा केंद्राशी बोला’

रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यावर सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काळाबाजार होत असताना सरकारने  कडक कारवाई केली पाहिजे. ज्या राज्यांमध्ये करोनाची दुसरी लाट नाही, अशा राज्यांमधून रेमडेसिवीर मागवता येईल का, किंवा तेथील कंपनीकडून पुरवठा करता येईल का, या दृष्टीने सरकारने लक्ष दिले पाहिजे. राज्य सरकारने लसींवरून राजकारण थांबवले पाहिजे.  माध्यमासमोर बोलण्यापेक्षा केंद्र सरकारशी चर्चा केली पाहिजे. उत्तर प्रदेशपेक्षा जास्त लसी  महाराष्ट्राला देण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:31 am

Web Title: truth in waze letter needs to come out fadnavis abn 97
Next Stories
1 शववाहिकेसाठीही दोन तासांची प्रतीक्षा!
2 अंत्यसंस्कारासाठी दिलेल्या पीपीई किटची विक्री
3 ‘रेमडेसिवीर’साठी रुग्णांची फरफट!
Just Now!
X