09 August 2020

News Flash

चोवीस तासांमध्ये दोन खुनांनी शहर हादरले

दुसरी खुनाची घटना नवीन कामठी पोलीस ठाण्यांतर्गत समोर आली.

प्रतिकात्मक छायाचित्र

पाचपावलीत दोन गटांत हाणामारी; कामठीत अज्ञात इसमाचा खून

गेल्या चोवीस तासांमध्ये शहराच्या हद्दीतील पाचपावली व नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन खुनाच्या घटना समोर आल्या आहेत. दुचाकीचा धक्का लागल्याने दोन गटात उद्भवलेल्या भांडणातून पाचपावली परिसरात खून झाला असून नवीन कामठीमध्ये एका अज्ञात इसमाला ठार करून रस्त्याच्या कडेला फेकण्यात आल्याची बाब समोर आली.

शुभम सदावर्ते (१८) रा. बावरी विहिरीजवळ, चकना चौक असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून ९ जणांना रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आली. पिंटू सुरेश बेंडेकर, जितेश सुरेश बेंडेकर, आकाश माहुरे, बादल नरेश पडोळे, मंगेश ऊर्फ बजरंगी चिरोडकर, सुशांत ऊर्फ लल्ला सोनकुसरे, विक्की बुटऱ्या, आकाश बुटऱ्या, विक्की ऊर्फ कावळा, यश ऊर्फ दौला आणि कृष्णा अशी आरोपींची नावे आहेत. गेल्या ३ डिसेंबरला रात्रीच्या सुमारास शुभम हा मित्र पीयूष आगडे यांच्यासह दुचाकीने बांग्लादेश परिसरातून जात असताना आरोपी पायदळ येत होते. यावेळी दुचाकीचा धक्का आरोपींना लागला. त्यावरून त्यांच्यात भांडण झाले व हाणामारी झाली. या घटनेचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास शुभम व त्याच्या मित्राला  एका मैदानाजवळ गाठले व त्यांना लोखंडी रॉड, लाकडी दंडुक्याने मारहाण केली व पळून गेले. यात शुभम यांच्या महत्त्वपूर्ण अवयवांना गंभीर दुखापत झाली. पीयूषही जखमी झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारापूर्वीच शुभमचा मृत्यू झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक रिजवान शेख, उपनिरीक्षक मनीष गोडबोल यांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.

दुसरी खुनाची घटना नवीन कामठी पोलीस ठाण्यांतर्गत समोर आली. नवीन कामठी पोलीस हद्दीतील नागपूर-जबलपूर महामार्गावरील नेरी शिवारात गुरुवारी सकाळी ११ वाजता एका इसमाचा मृतदेह सापडला. इसमाचा धारधार शस्त्राने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह धर्मराज चकोले यांच्या शेतात जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून सहाय्यक निरीक्षक रातरत्न बन्सोड व पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात खुनाचा गुन्हा दाखल केला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी पत्रक जाहीर केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 12:25 am

Web Title: twenty four hours two murder in nagpur akp 94
Next Stories
1 अनैतिक संबंधातून महिलेचा खून
2 कांद्यानंतर आता बटाटाही महागला
3 हैदराबाद चकमकीवर तीव्र प्रतिक्रिया
Just Now!
X