News Flash

दोन अपघातांत दोघे ठार

वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अज्ञात वाहनांनी धडक दिल्याने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला.

वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अज्ञात वाहनांनी धडक दिल्याने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. पहिली घटना हिंगणा पोलीस ठाण्यांतर्गत घडली. परमानंद प्रकाश जारंडे (३१) रा. वागधरा हा १६ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास एमएच-४०, बीएन-२७८०  क्रमांकाच्या दुचाकीने गुमगावकडून कॅन्सर रुग्णालयात जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्याला धडक दिली. यात तो जखमी झाला. त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा २१ सप्टेंबरला मृत्यू झाला.

दुसरी घटना मानकापूर पोलीस ठाण्यांतर्गत बुधवारी रात्री २ वाजताच्या सुमारास घडली. ईश्वर देवाजी चौरागडे (३०) रा. खापरखेडा हा आपल्या एमएच-३१, ईए-३०६१ क्रमांकाच्या दुचाकीने फरस चौकाकडून कोराडीकडे जात असताना जड वाहनाने त्याला धडक दिली. यात जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकांविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरण्याचे गुन्हे दाखल केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 2:03 am

Web Title: two death accident akp 94
Next Stories
1 माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात, दोन जागीच ठार
2 विदर्भातील विद्यापीठांमध्ये प्राचार्य भरतीचे रॅकेट
3 लोकजागर : व्यवस्थेतील ‘खड्डय़ां’चे काय?
Just Now!
X