News Flash

नक्षलवाद्यांनी केलेल्या भुसुरूंग स्फोटात दोन पोलीस जखमी

जखमींना उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूरला हलवण्यात आले

मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील राजेदाहे गावात घर कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.

नक्षलवाद्यांनी केलेल्या भुसुरूंग स्फोटात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. ही घटना गडचिरोतील कोरची या नक्षल प्रभावग्रस्त भागात घडली. जखमींना उपचारासाठी हेलिकॉप्टरने त्वरीत नागपूरला हलवण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. (सविस्तर वृत्ताची प्रतिक्षा)

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी छत्तीसगढ येथील तेलंगणा सीमेवर मोठी चकमक झाली. या चकमकीत १२ माओवादी ठार झाले. विशेष माओवादी विरोधी पथकाने आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली होती. तेलंगण सीमेवरील गोदावरी नदीलगत असलेल्या पुजारी कांकेर जंगलात ही चकमक झाली. यात एक जवान शहीद झाला. तसेच १२ माओवाद्यांमध्ये ६ महिलाही असल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2018 9:56 am

Web Title: two policemen injured in a landmine blast by naxals in gadchirolis korchi
Next Stories
1 सर्वाधिक अपघात पुण्यात
2 शहा-भागवत यांच्यात तब्बल चार तास चर्चा
3 पूर्वाचलच्या भाजप विजयात संघाच्या मराठी प्रचारकांचा निर्णायक वाटा
Just Now!
X