News Flash

नवीन वर्षांत खगोलीय घटनांची मेजवानी

२०२० हे नवीन वर्ष सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, उल्का वर्षांव, युती-प्रतीयुती अशा विविध खगोलीय घटनांनी भरलेले आहे.

दोन सूर्यग्रहणे, चार चंद्रग्रहणे, अनेक उल्का वर्षांव

२०२० हे नवीन वर्ष सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, उल्का वर्षांव, युती-प्रतीयुती अशा विविध खगोलीय घटनांनी भरलेले आहे. या नवीन वर्षांत दोन सूर्यग्रहणे व चार चंद्रग्रहणे अशी एकूण सहा ग्रहणांसह उल्का वर्षांव आणि युती-प्रतियुती पाहायला मिळणार आहे. यात दुर्मीळ असे कंकणाकृती सूर्यग्रहण उत्तर भारतातून दिसणार आहे.

जानेवारी महिन्यात १० व ११ तारखेला, ५ आणि ६ जूनला, ४ आणि ५ जुलैला तसेच नोव्हेंबर महिन्यात २९ व ३० नोव्हेंबरला घडणारी सर्व चंद्रग्रहणे ही छायाकल्प चंद्रग्रहणे आहेत. वर्षांतील सर्व चंद्रग्रहणे हे छायाकल्प असणे ही देखील आगळीवेगळी घटना आहे. यातील चार-पाच जुलैचे ग्रहण भारतातून दिसणार नाही. जून महिन्यात २१ तारखेला दुर्मीळ असे कंकणाकृती सूर्यग्रहण उत्तर भारतातून दिसणार आहे. डिसेंबर महिन्यात १४ तारखेला होणारे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. जानेवारी महिन्यात ३ आणि ४ तारखेला क्वाड्राटीड्स उल्का वर्षांव, एप्रिलमध्ये २२ व २३ तारखेला लायरीड उल्का वर्षांव,  ६, ७ मे रोजी अक्वारिस उल्का वर्षांव, २८-२९ जुलैला डेल्टा अक्वारिस उल्का वर्षांव, १२-१३ ऑगस्टला पर्सेईड उल्का वर्षांव, ७ ऑक्टोबरला ड्रॅकोनिड्स तर २१-२२ ऑक्टोबरला ओरिओनिड, ४-५ नोव्हेंबरला टोरीड तर १७-१८ नोव्हेंबरला लिओनीड उल्का वर्षांव, १३-१४ डिसेंबरला जेमिनिड आणि २१-२२ डिसेंबरला वर्षांचा शेवटचा उल्का वर्षांव पाहता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 1:52 am

Web Title: two solar eclipses four lunar eclipses several meteor showers akp 94
Next Stories
1 विदर्भाच्या मंत्र्यांपुढे कडवे आव्हान
2 वृक्ष, वन क्षेत्रात ५१८८ चौरस किलोमीटरची वाढ
3 विचार स्वातंत्र्य मिळाल्यानेच कादंबरी लिहिता आली