नागपूर : शिवजयंतीनिमित्त शाळेला सुटी असल्याने पोहायला जाणे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले. कन्हान नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाला. ही घटना आज बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. प्रवेश प्रवीण नागदेवे (१३) आणि अजेश नितनवरे (११) दोन्ही रा. हरदास नगर, कामठी

अशी मृतांची नावे आहेत. बुधवारी शाळांना शिवजयंतीनिमित्त सुटी होती. त्यामुळे कामठीतील जवळपास १६ मुले कन्हान नदीच्या पात्रात पोहोण्यासाठी गेली होती. महादेव घाटावर मुले पोहत असताना दोन जण बुडायला लागले. ते  दिसेनासे झाल्याने इतर मुले बाहेर निघाली व मदतीसाठी आरडओरड करू लागली. मदत पथकाने शोध घेतला असता दोघांचा बुडून मृत्यू झाला होता. मृत प्रवेश हा नूतन सरस्वती विद्यालयात नवव्या वर्गात शिकत होता व अजेश हा सेंट जेनेली शाळेत सातव्या वर्गात शिकत होता. या घटनेने कामठी परिसरात एकच शोककळा पसरली.