19 September 2020

News Flash

संरक्षक कठड्यावर आदळली कार; दोन क्रिकेटपटू ठार

यवतमाळजवळील घटना

भरधाव कार पुलाच्या संरक्षक कठड्यावर आदळून झालेल्या भीषण अपघातात वर्धा येथील दोन युवा खेळाडूंचा मृत्यु झाला. शनिवारी संध्याकाळी यवतमाळ जिल्ह्यातील चापडोह पुनर्वसन येथे ही घटना घडली. जयेश प्रवीण लोहिया (१८) व अक्षद अभिषेक बैद (१८) रा.रामनगर वर्धा अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. हे दोघेही क्रिकेट खेळाडू होते. या घटनेत इतर चार जण जखमी झाले.

यवतमाळ येथे टी-२० क्रिकेट सामने सुरू आहेत. या सामन्यामध्ये वर्ध्यातील रामनगर येथील ब्रदरहूड क्रिकेट संघही या स्पर्धेत सहभागी झाला होता. सामने खेळून या चमूतील काही खेळाडू वर्धा येथे (एम.एच.३२/एएच-३७७७) या क्रमांकाच्या कारने निघाले होते. चापडोह गावाकडून बायपासने वर्धाकडे जात असताना पुलासाठी बांधलेल्या संरक्षक कठड्यावर ही कार आदळली. यात जयेश आणि अक्षद हे दोघे ठार झाले.

जयेशचे वडील प्रवीण लोहिया हे कार चालवित होते. त्यांचे नियंत्रण सुटल्याने कार संरक्षक भिंतीवर आदळली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मदत करून जखमींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा पुढील तपास अवधूतवाडी पोलिसांनी सुरू केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2019 3:53 pm

Web Title: two young cricket players died in car accident bmh 90
Next Stories
1 सचिवांच्या आक्षेपानंतरही किंमतवाढीचा निर्णय
2 नागपूरमध्ये पारा ५.१ अंशावर
3 राज्य मराठी विकास संस्थेचा कारभार संचालकांविना
Just Now!
X