News Flash

‘उडता पंजाब’वरून टीका प्रसिद्धीसाठी पहलाज निहलानी यांची टीका

‘उडता पंजाब’वरून सेन्सॉर बोर्डावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अखेर न्यायालयाच्या आदेशामुळे ‘अ’ प्रमाणपत्रासह चित्रपट प्रदर्शित झाला.

‘उडता पंजाब’वरून टीका प्रसिद्धीसाठी पहलाज निहलानी यांची टीका

चित्रपटसृष्टीत १९९० ते २००० दरम्यान काळा पैसा असलेल्यांचा बराच वावर होता. आता ते दिवस संपले असून सध्या कंपन्या चित्रपटांना आर्थिक साहाय्य करीत आहेत. त्यामुळे यातील काळा पैसा जाऊन चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले असल्याचे मत सेन्सॉर बॉर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी व्यक्त केले. चित्रपटातील त्रुटी दाखवण्याचे काम सेन्सॉर बोर्डाचे असून ‘उडता पंजाब’वरून ज्यांनी टीका केली आहे, ती केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचे ते म्हणाले. एका पुस्तक प्रकाशनच्या निमित्ताने नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते.

‘उडता पंजाब’वरून सेन्सॉर बोर्डावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अखेर न्यायालयाच्या आदेशामुळे ‘अ’ प्रमाणपत्रासह चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, दुसऱ्याच आठवडय़ात प्रेक्षकांनी या चित्रपटाला नाकारले आहे. या चित्रपटावरील कात्री कुठल्याच दिग्दर्शकाला नको असली तरी सेन्सॉर बोर्डाला संस्कार बोर्ड म्हणत असेल तर मला त्याची कीव येते. एखाद्या व्यक्तीवर विशिष्ट विचारसरणीचा पगडा असू शकतो. मात्र, संस्थेवर विचारांचा पगडा नसतो. सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष या नात्याने चित्रपटाशी संबंधित संस्था म्हणून मला जे अधिकार आहेत त्याचा उपयोग करून जे काही सकारात्मक आहे त्याबाबत निर्णय घेणार आहे. कोणाच्या भावना दुखावत असतील किंवा दिग्दर्शक आणि निर्मात्याचे नुकसान होऊ नये म्हणून चित्रपटाला कात्री लावू नये, अशी जर चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांची मानसिकता असेल तर ते यापुढे चालणार नाही. समाजाच्या दृष्टीने ज्या गोष्टी घातक आहेत त्यावर निर्णय घेतच राहील. सेन्सॉर बोर्डात समितीच्या सदस्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातात. पाकिस्तानात ‘उडता पंजाब’वर शंभरावर प्रसंगांना कात्री लावली. मात्र, तेथे कोणी न्यायालयात गेले नाही, असे ते म्हणाले.

नरेंद्र मोदी चांगले आणि जलदगतीने निर्णय घेत आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार असल्याचे सांगून संस्कारी असणे ही भारताची परंपरा असून त्यात गैर काय, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2016 1:21 am

Web Title: udta punjab row anurag kashyap attacks censor chief says pahlaj nihalani acting like oligarch
Next Stories
1 दोघा भावांच्या उपस्थितीत रवींद्र सावंतचे शवविच्छेदन
2 नागपूरच्या विकासावर मुख्यमंत्री आज घेणार प्रदीर्घ बैठक
3 सुविधांचा अभाव असूनही तुकडय़ांची खैरात
Just Now!
X