भारतीय वन्यजीव संस्थेचा अहवाल

नागपूर : नागपूर ते जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ४४ वर पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळ १६ किलोमीटरच्या क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या ‘अंडरपास’ मधून मागील दहा महिन्यांत  सुमारे पाच हजार ४५० वन्यप्राणी गेल्याचे समोर आले आहे. ८९ वेळा या ‘अंडरपास’चा वापर वाघाने रस्ता ओलांडण्यासाठी के ला आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने या ठिकाणी ७८ ‘कॅ मेरा ’ लावले असून या संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर वेगाने जाणाऱ्या वाहनांखाली येऊन वन्यप्राणी मृत्युमुखी पडण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ४४ वर वाहनांच्या धडके त मृत्युमुखी पडणाऱ्या वाघ आणि बिबटय़ांची संख्या मोठी आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने या महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी खबरदारीच्या उपाययोजना कराव्या, हा मुद्दा राज्य तसेच राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत अनेकदा समोर आला.

या खबरदारीच्या उपाययोजना कशा असाव्यात याबाबत अभ्यासाची जबाबदारी देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडे सोपवण्यात आली. वन्यप्राण्यांना सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडता यावा याकरिता महाराष्ट्रातील नागपूर ते जबलपूर या राष्ट्रीय महामार्ग क्र . ४४ वर २५५ कोटी रुपये खर्च करून चार लहान पूल तसेच पाच ‘अंडरपास’ तयार करण्यात आले.

केवळ वन्यप्राण्यांसाठी के ली गेलेली ही देशातील सर्वात मोठी खबरदारीची उपाययोजना आहे. वन्यप्राणी याचा वापर सुरक्षितरीत्या करतात किं वा नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी सुमारे ७८ ‘कॅ मेरा ट्रॅप’ या ठिकाणी लावण्यात आले.

मार्च ते डिसेंबर २०१९दरम्यान या ठिकाणी किती वन्यप्राण्यांनी याचा वापर के ला हे पाहण्याकरिता ‘कॅ मेरा ट्रॅप’ वरून माहिती घेतली असता एक लाख ३२ हजार ५३२ छायाचित्र त्यातून मिळाले.

या ‘अंडरपास’चा सर्वाधिक वापर तीन हजार १६५ वेळा हरणांनी के ला असून ६७७ वेळा रानडुकरांनी त्याचा वापर केल्याचे दिसून आले.

रानमांजर, ससे, साप यासारख्या प्राण्यांनीदेखील त्याचा वापर के ल्याचे या अहवालातून लक्षात आले. ११ स्वतंत्र वाघांची नोंद या ठिकाणी करण्यात आली.