३५ लाख रुपये खर्च करून हवाई रुग्णवाहिकेने चेन्नईला हलवले

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणजे मनस्वी माणूस. ज्यांच्याशी सख्य जुळेल त्यांच्यासाठी वाट्टेल ते करणारे. ते नेहमी आपल्या  स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. अनेकदा जाहीर कार्यक्रमामध्ये  आपली मते निर्भीडपणे मांडतात. त्यांच्या भाषणाच्या अनेक चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित होत असतात. गडकरी यांची अशीच एक चित्रफित सध्या गाजत आहे.  या चित्रफितीत कर्तव्यकठोर गडकरींची एक हळवी बाजू समोर आली आहे. गडकरी यांच्या खाजगी स्वीय सहायकाची करोनामुळे प्रकृती बिघडल्यानंतर त्यांचे प्राण वाचवण्यासाठी गडकरींनी रात्री बँक उघडायला लावली. त्यातून ३५ लाख रुपये काढून स्वीय सहायकाला हवाई रुग्णवाहिकेने चेन्नईला हलवले अन् अखेर त्याचे प्राण वाचवले.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Abigail Lupi
फेनम स्टोरी: केअर गर्ल अबिगेल
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

एका चित्रफितीत हा हळवा किस्सा सांगताना गडकरी म्हणतात, माझे खासगी स्वीय सहाय्यक अतुल मंडलेकर यांची प्रकृती करोनामुळे अचानक बिघडली. त्यांना विवेका रुग्णालयात भरती करण्यात आले. मी डॉक्टरांना भेटलो असता त्यांनी आता आम्ही हरलो, काही करू शकत नाही असे सांगत हात टेकले. मी त्यांना उपाय विचारला असता त्यांनी चेन्नईमधील एमजीएम रुग्णालयाचे नाव सांगितले. तिथे हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण होते. त्यामुळे तिथे नेले तर काही तरी होऊ  शकते, असे डॉक्टर म्हणाले. पण, रुग्ण आयसीयूमध्ये आणि ऑक्सिजनवर असल्याने त्यांना नागपूरवरून चेन्नईला कसे न्यायचे हा प्रश्न  होता.  आमच्याकडे २४ तासांचा वेळ होता. मी घरी आल्यानंतरही चिंतेत होतो. कारण मंडलेकर यांचे वडील माझ्या मोठ्या भावासारखे होते. रात्री झोप लागली नाही. मी घरी आल्यावर कार्यालयातील स्वीय सहाय्यकांना गोळा केले आणि लगेच हवाई रुग्णवाहिकेची सोय करण्यास सांगितले. एमजीएम रुग्णालयासोबत चर्चा केली.  अमेरिकेतील डॉक्टर, मित्र शोधले. मला लगेच एमजीएम रुग्णालयाच्या एमडीचा, तसेच तेथील दीपा नावाच्या डॉक्टरांचा फोन आला. हवाई रुग्णवाहिकेसाठी ३५ लाख रुपये अग्रीम  पाहिजे असे कळवण्यात आले. सायंकाळी सहा वाजल्याने सगळ्या बँका बंद झाल्या होत्या. माझी पत्नी एका सहकारी बँकेची अध्यक्ष आहे. मी लगेच बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना  फोन करून बोलावले आणि रात्री लॉकर उघडता येईल का असे विचारले? मला लॉकरमधून ३५ लाख द्या, मी तुम्हाला उद्याच्या उद्या पैसे परत करेन असे सांगितले. अखेर पैसे आले, कसे पाठवायचे ते ठरले. हवाई रुग्णवाहिका आली. पाच डॉक्टरही सोबत होते. रुग्णाला चेन्नईला नेले. तिथे उपचार झाले आणि आज ते ठणठणीत बरे झाले आहेत. अतुल बरा झाल्यानंतर  मला भेटायला आला तेव्हा लहान मुलासारखा रडत होता. आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती मृत्यूला हात लावून परत आला आणि पुन्हा काम करू लागला याचा मला मनस्वी आनंद होता, असे गडकरी  या चित्रफितीत सांगतात. आयुष्यामध्ये केवळ सत्ता, संपत्ती हेच आयुष्याचे लक्ष्य नसते. सत्ता, संपत्ती ही केवळ माध्यमे आहेत, उद्दिष्ट असू शकत नाहीत. कारण मंत्रिपद किंवा कितीही सर्वोच्च सत्ता मिळाली तरी त्यातून काही समाधान मिळते असे नाही. संपत्ती कितीही मिळाली तरी समाधान मिळत नाही. एका पारिवारिक भावनेतून, सामाजिक दायित्वातून एकमेकांशी व्यवहार करणे खूप महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी या चित्रफितीत म्हटले आहे.