News Flash

पावसाळ्यापूर्वी महामार्ग वाहतूक सुरळीत करा, नितीन गडकरींचा आदेश

"दोषी असलेल्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी"

महामार्गाच्या अपूर्ण कामाबाबत खासदार रामदास तडस यांनी लक्ष वेधल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पावसाळ्यापूर्वी महामार्गाची कामे पूर्ण करण्याचे निर्देश महामार्ग विभागास दिले आहेत. केंद्रीय महामार्ग मंत्रालय अंतर्गत वर्धा लोकसभा क्षेत्रात काही कामे सुरू आहेत. सेलडोह‑सिंदी‑हमदापूर, सेवाग्राम‑पवनार व आर्वी‑तळेगाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम गत दोन वर्षापासून सुरू आहे. मात्र ही कामे अत्यंत संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार तडस यांनी नागपुरात नितीन गडकरी यांची आज भेट घेऊन या विषयी चर्चा केली.

महामार्गाची कामे संथगतीने सुरू असल्याने येणाऱ्या पावसाळ्यात अपूर्ण कामाचा त्रास वाहतुकीस होऊ शकतो. त्यामुळे अपघाताची भिती आहे. दोन्ही अपूर्ण कामाबाबत प्रशासन व संबंधित कंत्राटदारास सूचना करण्यात आल्या. पण कुठेही दखल घेतली गेली नाही. याविषयी नागरिक अत्यंत त्रस्त असल्याने कामे त्वरीत पूर्ण करण्याची कार्यवाही झाली पाहिजे, अशी अपेक्षा या भेटीत व्यक्त करण्यात आली.

नितीन गडकरी यांनी कामे त्वरीत पूर्ण करण्याची सूचना महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना याचवेळी केल्याचे खासदार तडस यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण व्हावी, रस्ता वाहतूकीसाठी सुरळीत करावा व दोषी असलेल्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असेही निर्देश गडकरी यांनी दिल्याचे तडस यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 6:04 pm

Web Title: union minister nitin gadkari order to complete highway work before monsoon sgy 87
Next Stories
1 आजपासून टाळेबंदी अंशत: शिथिल
2 लोकजागर : उपाय की मुस्कटदाबी?
3 Coronavirus : गर्भवतींना करोनाचा विळखा!
Just Now!
X