News Flash

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत मोठा गैरप्रकार

दरवर्षी होणाऱ्या परीक्षांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांवर गैरप्रकार केल्यावर कारवाई होते.

कॉपीबहाद्दरांकडून उणिवांचा गैरफायदा 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुरू असलेल्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना आळा घातल्याचा प्रशासनाने दावा केला असला तरी तो फोल ठरत आहे. परीक्षेदरम्यान मोठ्या संख्येत विद्यार्थी गैरप्रकार करीत असल्याचे समोर येत आहे. हा गैरप्रकार शोधणारी विद्यापीठाकडे सक्षम यंत्रणा नसल्याने या उणिवांचा कॉपीबहाद्दर फायदा घेत आहेत.

विद्यापीठाने नोव्हेंबरमध्ये अंतिम वर्षाची ऑनलाईन परीक्षा घेतली असली तरी परीक्षेतील तांत्रिक गोंधळ आणि उणिवांमुळेच परीक्षा चर्चेत राहिली. या परीक्षेत अनेक वर्षांपासून उत्तीर्ण न होऊ शकलेले विद्यार्थी परीक्षा पद्धतीच्या उदार धोरणामुळे चक्क गुणवत्ता यादीत आले. आता असाच काहीसा प्रकार हिवाळी २०२० परीक्षेत घडत असल्याचे समोर येत आहे. ऑनलाईन परीक्षेदरम्यान कुठलाही गैरप्रकार झाला तरी परीक्षा संकेतस्थळाच्या माध्यमातून यावर करडी नजर ठेवली जाणार असून विद्यार्थी साधा स्क्रीन सोडून गेला, काही आवाज आला किंवा कुठलाही गैरप्रकार करताना दिसला तरी परीक्षा यंत्रणेकडे लगेच त्याची माहिती होईल आणि संबंधितावर कारवाई करण्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला होता. मात्र, नुकताच हाती आलेल्या एका चित्रफितीमध्ये काही विद्यार्थी पुस्तक उघडून परीक्षा देतानाचे दृश्य आहे. असा प्रकार अनेक ठिकाणी घडला असून प्रत्येक परीक्षेला काही विद्यार्थ्यांनी एकत्र बसून परीक्षा दिल्याची माहिती आहे. याशिवाय काही महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना यासाठी मदत केल्याची माहिती आहे. मात्र, या गंभीर प्रकारांवर विद्यापीठाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही हे विशेष. दरवर्षी होणाऱ्या परीक्षांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांवर गैरप्रकार केल्यावर कारवाई होते. मात्र, ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार पकडणारी सक्षम यंत्रणा नसल्याने विद्यार्थी याचा फायदा घेत आहेत.

गैरप्रकार रोखणारी यंत्रणाच नाही

ऑनलाईन परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यापीठांद्वारे तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपमध्ये कुठलीच यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, केवळ नागपूर विद्यापीठच नव्हे तर राज्यातील कोणत्याच विद्यापीठाद्वारे ते वापरण्यात आले नसल्याचे समजते. त्यामळे ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांचे चांगलेच फावले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:02 am

Web Title: university online exam big malpractice akp 94
Next Stories
1 कठोर निर्बंधांची अंमलबजावणी सुरू
2 मेडिकलमध्ये वृद्ध दाम्पत्याचे लसीकरण
3 फेब्रुवारीनंतर प्रथमच बाधितांपेक्षा करोनामुक्त अधिक
Just Now!
X