23 July 2019

News Flash

नागपूरमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांवर चाकूहल्ला

दीड वर्षांपूर्वीही नागपूरमध्ये एका माथेफिरुने पाच महिलांवर चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली होती. त्यावेळी नागपूर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला.

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूरमध्ये मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांवर दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तीने चाकूहल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही महिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चाकूहल्ल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

नागपूरमधील शारदा चौक परिसरात दुचाकीस्वार तरुणाने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांवर शुक्रवारी सकाळी चाकूहल्ला केला. या महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

दीड वर्षांपूर्वीही नागपूरमध्ये एका माथेफिरुने पाच महिलांवर चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली होती. त्यावेळी नागपूर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. त्याचे रेखाचित्रही जारी करण्यात आले. मात्र, आरोपीला अटक करण्यात अपयशच आले होते. आता पुन्हा एकदा दोन महिलांवर चाकू हल्ल्याची घटना घडल्याने नागपूरमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

First Published on December 7, 2018 12:14 pm

Web Title: unknown attacker stabs two women during morning walk in sharda chowk area