News Flash

केवळ कागदोपत्री अस्तित्व असलेल्या संस्थांची नोंदणी रद्द

संस्था नोंदणी केल्यानंतर त्या नुसत्या कागदावर असल्याचे प्रमाण ३ लाख असून या संस्थांची नोंदणी रद्द करण्याचे काम सुरू आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सार्वजनिक न्यास कार्यालयात नोंदणी करणाऱ्या अनेक संस्था कित्येक वर्षांपासून कागदावरच आहेत. अशा संस्थांची नोंदणी रद्द करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व धर्मादाय विभाग असोसिएशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या इमारतीच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन आज शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधी व न्याय राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, जोगेंद्र कवाडे, चॅरिटी बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद गोडे, धर्मदाय आयुक्त आशुतोष करमरकर व सह धर्मदाय आयुक्त आभा कोल्हे उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री म्हणाले, समाजातील शेवटच्या माणसाचे समाधान करण्याचे काम ही व्यवस्था करते. धर्मदाय विभागाची व्यवस्था अप्रतिम असून महाराष्ट्राने आपले वेगळेपण अधोरेखित केले आहे. ही व्यवस्था गतिशिल करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे.

त्यासाठी डिजिटायजेशनचे काम अतिशय वेगाने केले जात आहे. संस्था नोंदणी केल्यानंतर त्या नुसत्या कागदावर असल्याचे प्रमाण ३ लाख असून या संस्थांची नोंदणी रद्द करण्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक न्यास कार्यालयाला भविष्यात सर्व सहकार्य करण्यात येणार असून याकडे विधी व न्याय राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील लक्ष घालतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 1:58 am

Web Title: unregistered organizations only cancellation of registration
Next Stories
1 budget 2019 : लोकाभिमुख अर्थसंकल्पाचे श्रेय नोटाबंदी, जीएसटीला
2 भाषा समृद्धीसाठी अनुवादक अकादमीच्या पर्यायावर विचार का नाही?
3 वाळू तस्करांचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला
Just Now!
X