21 April 2019

News Flash

अमेरिकेतील निवडणुकीत नागपूरकर धोपटे विजयी

श्रीकांत हे उत्तर अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील चेस्टरफिल्ड या शहरातील  निवडणुकीत विजयी आले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

नोकरी, व्यवसायासाठी अमेरिकत गेलेले भारतीय विविध क्षेत्रात भरारी घेत असतानाच आता मूळचे नागपूरकर  श्रीकांत धोपटे यांनी ‘टाऊनशिप कमिटी’च्या निडवणुकीत विजय प्राप्त करून अमेरिकेत राजकीय प्रवासाला प्रारंभ केला आहे.

ते नागपूर जिल्ह्य़ातील खापा येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील दिवंगत हरिदास वामनराव धोपटे हे भारतीय वायुदलात विंग कमांडर होते. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. श्रीकांत हे उत्तर अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील चेस्टरफिल्ड या शहरातील  निवडणुकीत विजयी आले आहेत. त्यांची निवड तीन वर्षांसाठी आहे. शहराचा प्रमुख निवड करणाऱ्या पाच सदस्यीय समितीमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. ते डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार होते. त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला पराभूत केले. ते सन २००० ला अमेरिकेला गेले. गेल्या दहा वर्षांपासून चेस्टरफिल्ड या १५ ते २० हजार  लोकसंख्येच्या शहरात राहत असून त्यांना नागरिकत्व मिळाले आहे. ४५ व्या वर्षी टाऊनशिप कमिटीच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

First Published on November 9, 2018 12:15 am

Web Title: us election nagpurkar won the shreekant dhopte