News Flash

डिजिटल शाळेचा प्रयोग फसला

दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी  जिल्ह्य़ातील सर्व शाळा डिजिटल करण्याची घोषणा केली होती.

(संग्रहित छायाचित्र)

ज्योती तिरपुडे

बोर्ड कार्यान्वितच झाले नाही

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्य़ातील डिजिटल शाळेचा प्रयोग पूर्णपणे फसला आहे. काही शाळांमध्ये मध्ये  डिजिटल बोर्ड कार्यान्वितच (इन्स्टॉल) झाले नाही तर काही ठिकाणी वीज नसल्याने ते पडून आहेत.

दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी  जिल्ह्य़ातील सर्व शाळा डिजिटल करण्याची घोषणा केली होती. त्या प्रक्रियेला सुरुवातही झाली, पण त्यात गांभीर्याचा अभाव दिसून आला. शाळा डिजिटल करण्यासाठी आवश्यक बोर्ड अद्यापही कार्यान्वित झाले नाहीत. काही शाळांमध्ये त्याला उदईने ग्रासले.

पहिल्या टप्प्यात १०२ शाळा डिजिटलाईज करण्यात येणार होत्या. शाळांची निवड करताना जेथे वीज नाही अशा शाळांचा त्यात समावेश करण्यात आला. त्यांना डिजिटल बोर्ड देण्यात आले.  डिजिटल बोर्डाचे स्वतंत्र भाग एकत्र करून त्यातून विद्यार्थ्यांना कठीण संकल्पना सोप्या पद्धतीने शिकवणे हा त्यामागील उद्देश होता. मात्र, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून डिजिटल बोर्ड काय असते याची कल्पनाच नसल्याने डिजिटलायझेशनच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. एका शाळेत डिजिटल बोर्डाला कार्यान्वित करण्यासाठी जेमतेम ७०० ते ८०० रुपये खर्च होतो. ज्या कंपनीला हे काम देण्यात आले त्याचा परतावा त्यांना मिळाला आहे. मात्र, ते बोर्ड कार्यान्वित करण्याची जबाबदारी कंपनीने पाळलेली नाही. नाममात्र शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यात कामठीच्या तळोदी बुद्रूक येथील शाळेचा समावेश आहे.

‘‘जिल्ह्य़ातील सर्व शाळा डिजिटल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ६० शाळा डिजिटलाईज झाल्या आहेत. काही शाळांमध्ये आवश्यक साधने देण्यात आली आहेत. त्यांचे काम सुरू आहे. ३०-३५ शाळा अद्याप डिजिटल व्हायच्या राहिल्या आहेत. त्याचे कामही लवकरच सुरू होईल.’’

– चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 12:50 am

Web Title: use of digital school is unsustainable
Next Stories
1 किरवानी, बिलासखानी-तोडी-भैरवीतून साकारली सेनेची ‘मार्शल धून’
2 मध्यप्रदेश बसस्थानकाच्या जागेचा वाद उच्च न्यायालयात
3 नक्षलवादी प्रा. साईबाबाला १९ प्रकारचे आजार
Just Now!
X