डॉ. सी.डी. मायी यांचे प्रतिपादन; प्रयोगशील शेतकरी पुरस्कार प्रदान

नागपूर : दिवं. वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत, शास्त्रज्ञांकडून विविध प्रयोग करून शेतकरी हिताच्या केवळ योजनाच आखल्या नाही तर त्या, सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले, असे प्रतिपादन डॉ. सी. डी. मायी यांनी केले.

वसंतराव नाईक फाऊंडेशन व वनराई फाऊंडेशन, नागपूरच्या संयुक्त विद्यमाने व रोटरी क्लब ऑफ नागपूरच्या सहयोगाने गुरुवारी धनवटे सभागृहात वसंतराव नाईक स्मृती प्रयोगशील शेतकरी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्र मात ते  बोलत होते. अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी व व्यासपीठावर नवी दिल्ली येथील कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, आमदार नीलय नाईक, अजय पाटील व नीलेश खांडेकर होते. संत्र्याच्या लागवडीत व पाण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरून विविध प्रयोग करणारे नागपूर जिल्ह्यतील प्रयोगशील शेतकरी धीरज जुनघरे यांचा यावेळी मान्?यवरांच्?या हस्?ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. वसंतराव नाईक यांच्या शेतीविषयक कार्यावर प्रकाश टाकताना डॉ. मायी यांनी महाराष्ट्रातील कृ षी क्रोंती के वळ दिवं. मुख्यमंत्री नाईक यांच्यामुळेच झाल्याचे सांगितले. महाराष्ट्र स्वयंपूर्ण करण्याची प्रतिज्ञा  वसंतराव नाईक यांनी के ली होती. शेती, पाणी आणि माती त्यांच्या रक्तात होते. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणारे ते एकमेव मुख्यमंत्री होते, अशी आठवण आमदार नीलय नाईक यांनी जागवली. महाराष्ट्र आज स्वयंपूर्ण आहे, त्याचे श्रेय  वसंतराव नाईक यांचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी के ले.  गिरीश गांधी यांनी महाराष्ट्रातील चार कृ षी विद्यापिठाच्या स्थापनेचा किस्सा सांगितला. धीरज जुनघरे यांनी सत्काराला उत्तर देताना सर्वाचे आभार मानले. संचालन अजय पाटील यांनी केले. डॉ. पिनाक दंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

जुनघरे यांना पुरस्कार देताना  गिरीश गांधी,  डॉ. सी.डी. मायी, नीलय नाईक,  अजय पाटील, नीलेश खांडेकर आदी.