जगनाडे चौक ते भांडे प्लॉट परिसरातील राहिवासी त्रस्त 

शहरातील जुन्या वस्तीतील नंदनवन भागात मंगल कार्यालयांची गर्दी झाली असली तरी बहुतांश ठिकाणी वाहनतळाची (पार्किंग) व्यवस्था नसल्याने लग्न समारंभाच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

जगनाडे चौकापासून ते भांडे प्लॉट चौक व त्यापुढे छोटा ताजबाग मार्गावरील सिमेंट रस्त्याशेजारी जवळपास १२ मंगल कार्यालये आहेत. यापकी बहुतांश मंगल कार्यालय किंवा सभागृहांना पाìकगची व्यवस्था नाहीबहुतांश मंगल कार्यालय किंवा सभागृहांना पाìकगची व्यवस्था नाही. जगनाडे चौकाकडून नंदनवनकडे जाताना मुख्य मार्गावरील माता अनसूया सभागृह आहे. येथे पाìकगची व्यवस्था आहे, असा फलक लावण्यात आला असला तरी जागा अपुरी आहे. त्यामुळे वाहनांची गर्दी रसत्यांवरच होते. थोडे पुढे गेल्यावर विरुद्ध बाजूला शुभम सांस्कृती सभागृह, गणनायक सभागृह, शाकम्बरी सभागृहात पार्किंगची व्यवस्था नाही. मंगलमूर्ती चौक ते भांडे प्लॉट चौक दरम्यान अशीच स्थिती आहे. अक्षय भवन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक भवनातही वाहने ठेवण्यासाठी जागा नाही. संगम टॉकिजशेजारी रस्त्यावर असलेल्या मधुर संगम मंगल कार्यालयाबाहेरही अशीच स्थिती पाहायला मिळते. एकूणच या भागात मंगल कार्यालयांना आणि सभागृहांना पाìकगची व्यवस्था नसल्याने वाहतुकीची कोंडी, ध्वनी व वायू प्रदूषणाच्या समस्यांचा मन:स्ताप नित्याचा झाला आहे.

फुटकळ विक्रेत्यांचाही त्रास

वाहनतळ नसल्याने मंगल कार्यालयांपुढे होणारी वाहनांची गर्दी एकीकडे वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरत असताना दुसरीकडे समारंभाच्या दिवशी कार्यालयांपुढे रस्त्यावर लागणारे हातठेलेवाले, भांडे विक्रीची दुकाने, आईस्क्रीम विक्रेत्यांमुळे त्यात आणखी भर पडते.

वाहनतळ व्यवस्थेची शहनिशा नाही

या भागातील मंगल कार्यालयांना परवानगी देताना पाìकग व्यवस्था करण्यात आली आहे की नाही, ही महापालिकेने शहानिशा केली किंवा नाही याबाबत शंका आहे. मंगल कार्यालयाबाहेर बेशिस्तीने लावलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करीत नाहीत. वरातीमुळे होणारी वाहतूक कोंडी हे नागपूरकरांसाठी आता नित्याचेच झाले आहे.

राम पालवे, जगनाडे चौक

वाहतूक पोलीस हवा  

नंदनवन मार्गावर अनेक महाविद्यालय आणि प्रमुख बाजारपेठ आहे. येथे नेहमी वाहतुकीची कोंडी होते. अशात या चौकात वाहतूक शिपाई नसतो. मंगलकार्यालयात येणाऱ्यांची वाहने रस्त्याशेजारी उभी असतात. मोठे वाहन जाऊ शकत नाही. आमचे घर शाकम्बरी सभागृहाशेजारी आहे. मात्र, तेथे पाìकगची व्यवस्था नाही. सकाळी आणि सायंकाळी रस्त्यांवर वर्दळ असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास येथील नागरिकांना होतो. अशात किमान सकाळी आणि सायंकाळी चौकात वाहतूक शिपाई हवा.

विनीत सांभरे, नंदनवन