21 March 2019

News Flash

वाहने जाळण्याचे लोण उपराजधानीतही

इमारतीचे जुने बांधकाम असून तळमजल्यासह एकूण दोन मजले त्या ठिकाणी आहेत.

वाहन जाळल्यानंतरचे चित्र

सावरकरनगरमध्ये सहा दुचाकी वाहने जाळली

नाशिक, पुण्यानंतर निवासी संकुलातील दुचाकी जाळण्याचे लोण आता उपराजधानीतही पोहोचले आहे. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरनगर परिसरात एका इमारतीमधील सहा दुचाकींना अज्ञात माथेफिरूने पहाटे चारच्या सुमारास आग लावली. या आगीत पाच वाहने भस्मसात झाली असून उर्वरित एक वाहन वाचविण्यात इमारतीमधील रहिवाशांना यश आले.   देवनगर-खामला मार्गावर डाव्या बाजूला प्लॉट क्रमांक ६ वर सागर अपार्टमेंट आहे. इमारतीचे जुने बांधकाम असून तळमजल्यासह एकूण दोन मजले त्या ठिकाणी आहेत.

दुचाकी वाहन उभे करण्यासाठी इमारतीच्या मागे सदनिकाधारकांनी एक शेड तयार केले आहे. त्यात दुचाकी वाहने ठेवण्यात येतात.  पहाटे पावणेपाचच्या सुमारास रोहित मुधोळकर यांना काही तरी जळत असल्याचा वास आला. कुलरची मोटार जळाली असेल असे समजून त्यांनी कुलर बंद केला. गॅलरीतून बघितले असता वाहने जळत असल्याचे त्यांना दिसले. इमारतीमधील इतर रहिवाशानाही त्यांनी जागे केले. लोकांनी पाणी टाकून आग विझवेपर्यंत पाच वाहने पूर्णपणे भस्मसात झाली होती. घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश शेंडे आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या संदर्भात इमारतीमधील रहिवासी सुनील कोरडे आणि दिलीप पाटील यांनी सांगितले की, इमारतीमध्ये सर्वाचे संबंध सलोख्याचे आहेत. वाहनाच्या ठिकाणी वीज जोडणी नाही. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्रश्नच नाही. कुणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावल्याचे दिसते.

First Published on June 9, 2018 1:34 am

Web Title: vehicles burning issue in nagpur