07 July 2020

News Flash

विदर्भातील करोना योद्धय़ांच्या चाचणीसाठी धोरण ठरवा

करोनाचा सामना करण्यासाठी देशातील सर्व यंत्रणा कामाला लागली आहे.

 

उच्च न्यायालयाचे ‘आयसीएमआर’ला आदेश

नागपूर : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या फळीतील पोलीस, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी व इतर संबंधित करोना योद्धय़ांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यासंदर्भात भारतीय वैद्यक व संशोधन संस्थेने (आयसीएमआर) धोरण ठरवावे. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांनी चाचणी करून घ्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.

करोनाचा सामना करण्यासाठी देशातील सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. कायदेमंडळ, न्यायालये अपंग झाली आहेत. वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे बंद आहे. अशात लाखो मजूर हजारो किमीचा प्रवास पायी करीत होते. त्यांच्यासाठी निवारागृह, अन्नाची व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर होते. या संकटकाळात पोलीस, आरोग्य, महसूल, नागरी संस्थांचे प्रशासन दिवसरात्र काम करीत होते. मोठय़ा शहरांमध्ये रुग्णांची संख्या अधिक असून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या फळीतील करोना योद्धे डॉक्टर, पोलीस, महापालिका प्रशासन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे पहिल्या फळीतील करोना योद्धय़ांची आरटी-पीसीआर चाचणी करण्याची विनंती करणारी जनहित याचिका सिटीझन फोरम फॉर इक्व्ॉलिटी या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्या. रवि देशपांडे आणि न्या. अमित बोरकर यांनी आदेश दिले. ही याचिका केवळ नागपूरपुरती मर्यादित नाही. विदर्भातील सर्व जिल्ह्य़ांमधील करोना योद्धे व प्रतिबंधित क्षेत्रात सेवा देणारे योद्धे करोना चाचणीसाठी पात्र आहेत. इच्छा व्यक्त करणाऱ्या व लक्षणे दिसणाऱ्या करोना योद्धय़ांची प्रथम चाचणी करण्यात यावी. ही चाचणी कशाप्रकारे करण्यात यावी, किती लोकांची एका दिवशी चाचणी होईल आदी बाबींसंदर्भात आयसीएमआरने धोरण ठरवावे. त्यानुसार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 2:41 am

Web Title: vidarbha corona fighter test high court icmr order akp 94
Next Stories
1 गृहमंत्र्यांच्या घराजवळ दिवसाढवळ्या लूटमार
2 विलगीकरण केंद्रातील डॉक्टरांनाही विश्रांती मिळणार!
3 अकोला, अमरावतीचा मृत्यूदर कमी करण्याचा निर्धार
Just Now!
X