28 February 2021

News Flash

VIDEO: प्रजासत्ताक दिनी हवालदाराने उधळले विद्यार्थिनींवर पैसे

वाळके मुलींवर पैसे उधळतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

शाळेतील कार्यक्रमादरम्यान मद्यधुंद अवस्थेत पोलीस हवालदाराने विद्यार्थिनींवर पैसे उधळल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रमोद वाळके या पोलीस हवालदाराला निलंबित केले आहे. हवालदार अजय चौधरी व सुनील बन्सोड या दोघांची रवानगी मुख्यालयात करण्यात आली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त भिवापूर तालुक्यातील नांद येथील शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी हवालदार प्रमोद वाळके मद्यधुंद अवस्थेत मंचावर चढले व मुलींवर पैसे उधळले. वाळके हे भिवापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असून, नांदगावच्या बिटचे प्रमुख आहे. हवालदार अजय चौधरी व हवालदार सुनील बन्सोड उमरेड पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत आहेत. वाळके मुलींवर पैसे उधळतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर चौधरी व बन्सोड हे वाळकेला भेटायला नांद येथे गेले होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यात ठाणेनिहाय चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. चौधरी व बन्सोड आपल्या पोलीस ठाण्याची हद्द सोडून गेल्यामुळे कर्तव्यात कसूर करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्यावर विभागीय कारवाई करून, चौकशीअंती दोषी आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 5:12 pm

Web Title: video police constable showers cash on students during republic day in nagpur nand
Next Stories
1 उपराजधानीतील सायबर पोलीस ठाण्याचे भिजत घोंगडे!
2 ‘स्वाईन फ्लू’ने आणखी एक मृत्यू
3 सतीश उकेंचा माफीनामा उच्च न्यायालयाने फेटाळला
Just Now!
X