आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

नागपूर :  कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतर मुंबई आणि ठाण्यात रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी विदर्भ, मराठवाडा आणि राज्याच्या इतर काही भागात बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे टाळेबंदी वाढवण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा के ली जाईल, असे सांगून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १ मेनंतरही टाळेबंदी कायम राहणार असल्याचे संके त दिले. मंत्रिमंडळाची बैठक उद्या, बुधवारी होत आहे.

वडेट्टीवार यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्पष्ट के ले की, विदर्भ, मराठवाडा आणि राज्याच्या काही भागात रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. परिणामी, राज्यात टाळेबंदी वाढवण्यावर उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठक चर्चा के ली जाईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर २२ एप्रिल ते १ मे पर्यंत लावण्यात आलेले कडक निर्बंध आणखी काही दिवस राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक तसेच जिल्ह्य़ाबाहेरील येणाऱ्या वाहनांना ई-पास बंधनकारक करण्यात आले आहे.

शिवाय अत्यावश्यक सेवेतील (औषध वगळता) दुकानांना के वळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत लोकलच्या प्रवासावर निर्बंध आहेत. आता मुंबई आणि ठाण्यातील रुग्णांची टक्केवारी घटली आहे. पण, विदर्भ आणि मराठवाडय़ातील अनेक जिल्ह्य़ात रुग्णांच्या संख्येत घट दिसत नाही. म्हणून टाळेबंदीचा कालावधी वाढण्यावर विचार करण्यात येत आहे. रुग्णसंख्या वाढत आहे. त्याबरोबर प्राणवायूचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. प्राणवायूअभावी नागपूरसारख्या शहरात नवीन कोविड के अर सेंटरला परवानगी दिली जात नाही. रुग्णालयात खाटांची कमतरता आहे. अशी अनेक आव्हाने आरोग्य यंत्रणेसमोर आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील टाळेबंदी पुन्हा वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.