News Flash

क्रिकेट बुकी अलेक्झांडरला ‘व्हीआयपी’ वागणूक

हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉईंटमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर छापा टाकण्याची घटना रविवारी उघडकीस आली.

हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉईंटमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर छापा टाकण्याची घटना रविवारी उघडकीस आली. गुन्हेगारी जगतातून मिळालेल्या माहितीनुसार कुख्यात क्रिकेट बुकी हृदयराज ऊर्फ राज जोसेफ अलेक्झांडर असल्याची माहिती मिळत आहे. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संगनमताने ही कारवाई करण्यात आली, अशी चर्चा गुन्हे जगतात आहे.

हॉटेल्स व्यवसायाला चांगले दिवस येत आहेत, परंतु सध्या मोसम नसल्याने पर्यटकांची संख्या रोडावली आहे. पर्यटक नसल्याचे बघत शहरातील काही मोठमोठय़ा नामांकित हॉटेलमध्ये अवैध धंद्यांना ऊत येत आहे. हॉटेल आणि फार्म हाऊसवर जुगार अड्डे चालवण्यासाठी संचालकांनी मोर्चा वळवला आहे. हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉईंटमध्ये खोली क्रमांक ३०१ मध्ये शहरातील १५ जुगारी जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. गुन्हे शाखेने पंटर पाठवून रविवारी पहाटेच्या सुमारास हॉटेलमध्ये छापा घातला. त्यावेळी आरोपी परेश नंदलाल सादरानी रा. नेताजी नगर, कळमना, हृदयराज ऊर्फ राज जोसेफ अलेक्झांडर रा. हिदुस्थान कॉलनी, अमरावती मार्ग, विजय जवाहरलाल बुग रा. खामला, सिंधी कॉलनी, मनीष गोपीचंद तोतवानी रा. सिंधी कॉलनी, खामला यांच्यासह त्यांच्या एकूण ९ साथीदारांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून ३ लाख ६३ हजार रोख सापडले होते. पोलिसांनी या कारवाईत सॅन्ट्रो कार जप्त केली आहे. हॉटेलमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती बुकी अलेक्झांडरनेच पोलिसांना दिली असून त्यानंतर गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही कारवाई केल्याची माहिती आहे.

बारा लाखाचे काय झाले?

कारवाईत पकडण्यात आलेले सर्वजण कुख्यात क्रिकेट बुकी आहेत. त्यांची प्रत्येकी एक लाख रुपयांची ‘भिसी’ असते. अशाप्रकारे प्रत्येक महिन्यात सर्व रक्कम ते एका सदस्याला वितरित करतात. हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉईंटमध्येही सर्व बुकी जुगार खेळत ‘भिसी’ वितरित करण्यासाठीच बसले होते. दरम्यान, पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत केवळ साडेतीन लाख रोख दाखविण्यात आले, पण त्या दिवशी ‘भिसी’चे बारा लाख रुपयांचे काय झाले? असा सवाल उपस्थित होत आहे. या कारवाईवेळी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त नीलेश राऊत उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत कारवाईत गडबड कशी झाली? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 2:55 am

Web Title: vip treatment to alekzandra cricket bookie
Next Stories
1 ‘ड्रॅगन पॅलेस’च्या विकासाकरिता दहा कोटी
2 शिकाऱ्यांपासून बचावासाठी वाघांना आता ‘रेडिओ कॉलर’
3 सहकारी बँकांतील २५ घोटाळेबाजांवर गुन्हा
Just Now!
X