शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली, आणि सर्वाधिक जागा मिळवलेला भाजपा पक्ष विरोधीपक्षात बसला. ५ वर्ष राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात आता विरोधीपक्ष नेत्याची माळ पडली. विरोधीपक्षाला आपल्या भाषणांमधून सडेतोड प्रत्युत्तर देणाऱ्या फडणवीसांचं एक वेगळं रुप समोर आलं.

नागपूरमध्ये आयोजित खासदार क्रीडा महोत्सवात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि टीम इंडियाचा अष्टपैलू गोलंदाज हार्दिक पांड्या उपस्थित होता. यादरम्यान गडकरी आणि फडणवीस यांनी हार्दिक पांड्याला गोलंदाजी केली. महत्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी टाकलेला चेंडू हार्दिक पांड्यालाही खेळता आलेला नाही.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना दोन गुन्ह्यांची माहिती लपविल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयातून काही प्रमाणात दिलासा मिळाला असून त्यांची पुनर्विचार याचिका आता ऐकली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील घडामोडीनंतर नागपुरातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी १० फेब्रुवारीपर्यंत सुनावणी तहकूब केली.