02 March 2021

News Flash

हवामान खात्याचा ‘अंदाज’ १५ दिवसांपासून बंद

प्रादेशिक हवामान केंद्रावरून यापूर्वी जिल्हास्तरावर हवामानाची माहिती दिली जात नव्हती.

जिल्हानिहाय हवामानाचा अंदाज देणाऱ्या हवामान खात्याच्या संकेतस्थळावरची ताजी माहिती गेल्या १५ दिवसांपासून दिलीच जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. हवामानात सातत्यााने होणाऱ्या बदलांच्या पाश्र्वभूमीवर हे चित्र संतापजनक आहे. दरम्यान, शहराबाबत गेल्या १५ दिवसांपासून एकच इशारा वारंवार देण्यात आला आहे. त्यामुळे प्रादेशिक हवामान केंद्राचा हलगर्जी कारभार समोर आला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्रावरून यापूर्वी जिल्हास्तरावर हवामानाची माहिती दिली जात नव्हती. त्यावर ओरड  झाल्यानंतर केंद्राच्या संकेतस्थळावर  ही माहिती देणे सुरू झाले. त्यातही आता महत्त्वाच्या क्षणीच संकेतस्थळावर जिल्हास्तरीय हवामानाची माहिती उपलब्ध होत नसल्याचे लक्षात आले आहे. गेल्या १५ दिवसांपासून हा प्रकार सुरू  आहे. राज्याच्या संकेतस्थळाने मध्यंतरी गारपिटीचा इशारा दिला तेव्हा एक-दोन दिवस प्रादेशिक संकेतस्थळावरही जिल्हानिहाय हवामानाची माहिती देण्यात आली. त्यानंतर देणे बंद झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निधी व देयकाचा वाद यासाठी कारणीभूत आहे.  ऐन महत्त्वाच्या क्षणी जर माहिती मिळत नसेल  तर काय उपयोग, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. सामान्य माणूस, प्रसारमाधमांची हवामानाविषयीची भिस्त या संकेतस्थळावर असते. याठिकाणी शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या हवामानाचा एक स्वतंत्र कक्ष आहे. त्यात केवळ शेतकरी सल्लाच असतो, तर या संकेतस्थळावर येणारे वार्तापत्रही आता येत नाही. नागपूर शहराच्या  हवामानाबाबत माहिती उपलब्ध आहे. मात्र, त्यात दिलेली माहिती संभ्रमित करणारी आहे. पाऊस दिवसभर पडणारा की केवळ पावसाचे शिंतोडे असे काहीही वर्गीकरण त्यात नाही. तब्बल सातही दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस दाखवला आहे. मात्र, सध्याची शहरातली स्थिती ही वादळी वाऱ्यासारखी नाही.  एकूणच प्रादेशिक हवामान खात्याचे संकेतस्थळ अपूर्ण असल्याची सध्याची स्थिती आहे.

लवकरच अडचण दूर होईल

संकेतस्थळाचे सध्या सुरक्षा अंकेक्षण सुरू आहे. त्यामुळे हवामानाचा इशारा आम्ही ईमेलच्या माध्यमातून पीआयबी, जिल्हा माहिती कार्यालयाला पाठवत आहे. इतर माहिती मात्र अपडेट होत आहे. केवळ हवामानाचा इशारा दिला जात नाही. मात्र, लवकरच ही अडचण दूर होईल आणि हवामानाची जिल्हानिहाय माहिती या संकेतस्थळावरून दिला जाईल, असे प्रादेशिक हवामान केंद्राचे अधिकारी ए.डी. ताठे म्हणाले.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 2:35 am

Web Title: weather forecast close last 15 days
Next Stories
1 रेल्वे फलाट ‘थर्ड क्लास’
2 मेट्रोचा वेग ताशी ९० कि.मी.
3 दशकात ४८२ हत्तींचा वीज प्रवाहामुळे मृत्यू
Just Now!
X