News Flash

पतीचे हात खुर्चीला बांधून शरीरसंबंध, नंतर गळा चिरुन हत्या; नागपुरातील धक्कादायक घटना

पतीला अश्लील चित्रफित दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले

प्रातिनिधिक

नागपुरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. तपासादरम्यान कौटुंबिक कलहातून अनेक महिन्यांपासून विभक्त राहणाऱ्या पाचव्या पत्नीनेच पतीची हत्या केल्याची माहिती समोर आली. पतीला खुर्चीला हात बांधून शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर गळा चिरुन हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर पोलीसही चक्रावले. रजत संकुलच्या एका सदनिकेत दोन दिवसांपूर्वी ही हत्या झाली होती. आरोपी पत्नीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.

लक्ष्मण रामलाल मलिक असं ६५ वर्षीय मृत व्यक्तीचं नाव आहे. हत्येप्रकरणी ३१ वर्षीय पत्नी स्वाती नरेंद्र पाचपोहोरला अटक करण्यात आली आहे. लक्ष्मण स्वातीचा दुसरा पती होता. त्याच्यापासून तिला सहा वर्षांचा मुलगादेखील आहे. दोन वर्षांपासून तो तिच्यापासून वेगळा राहत होता. सोमवारी दुपारी स्वाती तिथे आली. त्यानंतर पतीला अश्लील चित्रफित दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यासाठी पतीचे हात खुर्चीला बांधले आणि चाकूने गळा कापला. यानंतर दुपारी ती रिक्षाने घऱी आली होती.

पोलिसांनी याप्रकरणी शंभरहून अधिक लोकांची चौकशी केली. पण स्वातीच्या जबाबात सत्यता दिसत नसल्याने कसून चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली. स्वातीने पतीपर्यंत पोहोचण्यासाठी वापरलेल्या ओला कॅबच्या चालकाचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.

तिसऱ्या पुरुषासोबत संबंध
आरोपी स्वातीला तीन महिन्यांपूर्वी एक मुलगी झाली, त्यामुळे पती तिच्यावर संशय घेत होता. तिचे एका स्कूल बस चालकासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती त्याला मिळाली होती. तेव्हापासून तो तिच्याकडे पहिल्या मुलाचा ताबा मागत होता. तिने त्याच्या निवृत्तीवेतन खात्याचे एटीएम कार्डही ठेवून घेतलं होतं. त्यातून या दोघांमध्ये वाद होता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 9:10 am

Web Title: wife murderd husband in nagpur after showing porn clip and sex sgy 87
Next Stories
1 ‘एमपीएससी’ला अंधारात ठेवून परीक्षा स्थगितीचा निर्णय!
2 सिंचन घोटाळ्याची सुनावणी सहा महिन्यांत पूर्ण करा
3 व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट
Just Now!
X