नागपूरहून रिकामे टँकर रवाना

नागपूर : देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर येथे प्राणवायूचे टँकर ठेवण्याची व्यवस्था झाली असून येथून आवश्यक तेथे टँकर पुरवठा के ला जाऊ लागला आहे. सोमवारी मध्यरात्री आठ रिकामे टँकर अंगुलला पाठवण्यात आले. नागपुरात टँकर उपलब्ध झाल्याने प्राणवायू पुरवठा करण्यातील वेळेची बचत होत आहे.

देशातील पहिली रेल्वेगाडी (ऑक्सिजन एक्स्प्रेस) विशाखापटणमहून २३ एप्रिलला नागपुरात दाखल झाली. या गाडीतून तीन टँकर प्राणवायू नागपूरला मिळाले होते. मुंबईहून रिकामे टँकरपाठवण्यात आले होते. त्यात खूप वेळ गेला, शिवाय खर्चही अधिक करावा लागला. म्हणून नागपूरला रिकामे टँकर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. येथून आता रिकामे टँकर आवश्यकतेनुसार पाठवले जात आहे. सोमवारी प्रथमच नागपूरहून रिकामे टँकर ओडिशाच्या अंगूलला पाठविण्यात आले. तेथून प्राणवायू भरून आवश्यक असलेल्या ठिकाणी ते पाठवण्यात येणार आहे.