News Flash

रेल्वेतून मानवी तस्करी ; वकील महिलेच्या प्रयत्नामुळे प्रकार उघडकीस

३३  अल्पवयीन मुलांना नंदूरबारला घेऊन जात असलेल्या आठ युवकांना ताब्यात घेण्यात आले.

नागपूर : हावडय़ाहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाडीत तब्बल ३३  अल्पवयीन मुलांना नंदूरबारला घेऊन जात असलेल्या आठ युवकांना ताब्यात घेण्यात आले. हा मानवी तस्करीचा प्रकार एका वकील महिलेने उघड केला. या मुलांना राजनांदगाव येथे उतरवण्यात आले.

हावडा एक्सप्रेसमध्ये ८ ते १२ वर्षांची मुले एकत्र बसली होती. या बोगीत रायपूर येथून एक महिला वकील चढल्या. त्यांना इतक्या मोठय़ा प्रमाणात लहान मुले एकत्र असल्याने शंका आली. त्यांच्यासोबतच्या युवकाला याबद्दल विचारले असता, त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे या वकील महिलेने रायपूरच्या पोलीस अधीक्षकांना भ्रमणध्वनीवरून याबद्दल कळवले. त्यांनी राजनांदगाव पोलिसांना सूचना दिली. त्यांनी रेल्वेस्थानकावर पोहचून मुलांना ताब्यात घेतले. युवकाच्या चौकशीतून आणखी काही शयनयान डब्यात मुले असल्याचे समजले. अशा एकूण ३३ मुलांना राजनांदगाव येथे उतरवण्यात आले. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या आठ युवकांना ताब्यात घेण्यात आले. मुलांना चाईल्ड लाईनच्या सुपूर्द करण्यात आले.

दरम्यान, नागपूर येथील तिकीट तपासनीस रितेश इनुमुला हे या शयनयान डब्यामध्ये होते. ते बिलासपूर येथून या बोगीवर लक्ष ठेवून होते. त्यांनी तिकीट तपासणी केली असता आठ जणाचे तिकीट होते आणि त्यांच्यासोबत प्रत्येक दोन अल्पवयीन मुले होती. त्यांच्यासोबत असलेल्या युवकाला त्यांनी विचारले. त्याने शिक्षक असल्याचे सांगितले आणि हावडय़ाहून या मुलांना नंदूरबार येथे नेण्यात येत असल्याचे सांगितले. परंतु त्याने कोणत्या शाळेत घेऊन जात आहे याचा पुरावा दिला नाही. तसेच शिक्षक असल्याचे   ओळखपत्र देखील दाखवले नाही. या तिकीट तपासनीसाने आपल्या वरिष्ठांना कळवले. दरम्यान रायपूर येथून महिला वकील सर्वसाधारण तिकीट घेऊन या बोगीत चढल्या आणि रायपूरच्या पोलीस अधीक्षकाला फोन लावला, असे सूत्रानी सांगितले. प्रथमदर्शनी हे मानवी तस्करीचे प्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 5:11 am

Web Title: woman lawyer exposed human trafficking in train zws 70
Next Stories
1 ‘हनी ट्रॅप’ मधील आरोपी निशांतचे प्रकरण नागपूर न्यायालयात वर्ग
2 पोलिसांचा गणवेश घालून भररस्त्यावर ‘वसुली’
3 ‘फास्ट फूड’च्या काळातही पारंपरिक न्याहारीच खाऊ घालणारे फिरते उपाहारगृह!
Just Now!
X