नागपूर : कर्ज फेडण्यास विलंब झाल्याने एका सावकाराने कर्जबाजारी महिलेवर बलात्कार केला. ही घटना जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नरेश चेतराम चोकसे (६०, रा. मोदी पडाव, कामठी) असे आरोपी सावकाराचे नाव आहे. पीडिता ४० वर्षीय महिला शेतमजूर असून ती पती व मुलीसह राहते. गेल्या काही महिन्यांपूर्वी ती आर्थिक अडचणीत होती. घरी पैशांची नितांत गरज असल्याने तिने आरोपीकडून १० हजार रुपये कर्ज घेतले होते. मात्र टाळेबंदीमुळे सहा महिने हाताला काम नसल्याने ती व तिचे पती बेरोजगार होते. यामुळे कर्ज फेडण्यास त्यांना विलंब झाला. पण, आरोपीची तिच्यावर वाईट नजर होती. एक दिवस कर्जवसुलीच्या नावाने तो घरात शिरला व तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 27, 2020 12:42 am