हातपाय बांधले असल्याने घातपाताची शंका

नागपूर : जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनात ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी उघडकीस आली. मृताची ओळख पटलेली नसून तो मनोरुग्ण होता. पण, मृतदेहाचे हातपाय बांधले होते, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा घातपात आहे की पोलीस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

१७ सप्टेंबरला ताजबाग परिसरात ३५ वर्षीय युवक नागरिकांच्या दिशेने दगड फेकत होता. याबाबत सक्करदरा पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याने पोलिसांना शिवीगाळ केली. पोलिसांनी त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. तो मनोरुग्ण असून त्याला मनोरुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी पोलिसांना दिला. न्यायालयाच्या आदेशासाठी पोलीस त्याला न्यायालयात घेऊ न आले. याचदरम्यान पोलीस वाहनात त्याची प्रकृती खालावली. पोलिसांनी त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. वाहनात मृत्यू झाला, त्यावेळी त्याचे हातपाय बांधले होते. यावरून पोलीस कर्मचाऱ्यांनी तो पळून जाऊ नये किंवा कुणावर हात उचलू नये म्हणून तर हातपाय बांधले होते का, याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसाच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्याने तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याने शिवीगाळ केली. पोलिसांनी त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. तो मनोरुग्ण असून त्याला मनोरुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पोलीस त्याला न्यायालयाच्या आदेशासाठी न्यायालयात घेऊ न आले. दरम्यान पोलीस वाहनात त्याची प्रकृती खालावली.