नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून धुळवडीवर करोनाचे सावट होते. मात्र यावर्षी करोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे आणि प्रशासनाने निर्बंध हटवल्यामुळे ठोक बाजारात रंग व पिचरीकाला छोटय़ा विक्रेत्याकडून मागणी वाढली आहे. मात्र, धुळवड दोन दिवसांवर आली असली तरी दहावी व बारावीच्या परीक्षांमुळे बाजारात खरेदीसाठी फारशी गर्दी नसल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील विविध भागातील बाजारपेठेत रंग, वेगवेगळय़ा आकाराच्या पिचकाऱ्या आणि इतर साहित्याची दुकाने थाटली आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे बाजारपेठेत पिचकाऱ्या व रंगाना मागणी नव्हती. मात्र यंदा बाजारपेठेत वेगवेगळय़ा प्रकारच्या चिनी पिचकाऱ्या, वॉटर गन, छोटी छत्री, बंदूक विक्रीसाठी आल्या आहेत.

शिवाय भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्याही विक्रीसाठी बाजारात आल्या आहेत. काही दुकानदारांनी दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या पिचकाऱ्यांचा साठा यंदा विक्रीसाठी काढला आहे. या पिचकाऱ्या चाळीस रुपयांपासून सहाशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. रंगाचे दर दहा, पंधरा रुपयांच्या पाकिटापासून दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत आहे. गेल्यावर्षी लोकांनी करोनाच्या धास्तीने धुळवड न खेळता घरी राहणेच पसंत केले होते. मात्र यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. जवळपास सर्वच निर्बंध हटवल्यामुळे सर्व व्यवहार सुरू झाले आहे. विविध कार्यक्रमांना गर्दी होऊ लागली आहे. मुखपट्टी लावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे होळी आणि धुळवडीची उत्सुकता असली तरी दहावी व बारावीच्या परीक्षेमुळे बाजारात पिचकाऱ्या व रंगाची खरेदी करण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. ठोक बाजारातून होळीच्या आठ दिवस आधी मोठय़ा प्रमाणात विक्री झाली असली तरी किरकोळ विक्रेत्याकडे मागणी नाही. चिनी साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी आले असले तरी काही लोक स्वदेशी साहित्य विक्री करण्याला प्राधान्य देत आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रंग व पिचकारीच्या किंमती पाच टक्क्यांनी वाढल्या असून ठोक बाजारातील उलाढाल ५० टक्क्यांनी वधारली आहे. होळीच्या आठ दिवस आधी बाजारातून पिचकाऱ्या व रंगाची मागणी मोठय़ा प्रमाणात झाली. यावर्षी चिनी बाजारपेठेतून पिचकाऱ्या व रंग मागवण्यात आले नाही. दोन वर्षांपासून विक्रेत्यांकडे पडून असलेला माल यावेळी  बाहेर काढण्यात आला आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकातामधून मोठय़ा प्रमाणात धुळवडीला लागणारे साहित्य मागविण्यात आले आहे.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
solapur, 1139 crores turnover, onion business in Solapur, during adverse times, onion profit solapur, solapur Agricultural Produce Market Committee, onion in solapur, farmer, marathi news,
प्रतिकूल काळातही सोलापुरात वर्षात कांदा व्यवहारातून ११३९ कोटींची उलाढाल
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

– नईम खान, रंग विक्रेता