मागील ७५ वर्षात ब्रिटनमध्ये शिकलेल्या भारतातील ७५ माजी विद्यार्थी ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे, त्यांचा नुकताच ब्रिटनमध्ये सत्कार करण्यात आला. या पुरस्कारामध्ये महत्त्वाचे नाव म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरीपुत्र राजू केंद्रे.

हेही वाचा- नागपूरमध्ये तिरंगी लढतीत भाजपापुढे कडवे आव्हान; फडणवीस, गडकरी, बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
buldhana, Daughter in law, Lead Social Revolution, Perform Last Rites, Father in law, Gunj village, Sindkhed Raja, marathi news, maharashtra,
बुलढाणा: चौघी सुनांनी केले सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, सामाजिक क्रांतीतून स्त्री-पुरुष समानतेचे उदाहरण
buldhana, Daughter in law, Lead Social Revolution, Perform Last Rites, Father in law, Gunj village, Sindkhed Raja, marathi news, maharashtra,
बुलढाणा: चौघा सुनांनी केले सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, सामाजिक क्रांतीतून स्त्री पुरुष समानतेचे उदाहरण

विदर्भातील शेतकरी कुटुंबातील राजू केंद्रे यांना लंडनमध्ये ब्रिटिश कॉन्सिलतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ब्रिटिश कॉन्सिल, ब्रिटिश सरकारच्या उच्च शिक्षण विभाग आणि युके राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम नुकताच पार पडला. राजू केंद्रे हे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री खंदारे या छोट्याश्या खेड्यातील भटक्या समाजातून येतात. राजू यांच्या माध्यमातून कुटुंबातील पहिलीच पिढी उच्च शिक्षण घेणारी ठरली आहे. राजू यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे ते उच्च शिक्षणासाठी पुण्यात गेले, पण आर्थिक आणि सामाजिक अडचणीमुळे राजू यांना पुणे सोडावे लागले. या अनुभवातून त्यांनी एकलव्य फाउंडेशन सुरू करावे वाटले.

हेही वाचा- गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील नामकरण प्रकरण आणखी तापणार, आदिवासी कार्यकर्ते वसंंतराव कुलसंगे यांचे बेमुदत उपोषण सुरू

पुणे सोडल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पुढे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. २०२१ मध्ये त्यांना जगातिल प्रतिष्ठित अशी ब्रिटीश सरकारची मानाची चेव्हेनिंग स्कॉलरशिप मिळवली. त्या माध्यमातून एसओएस, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथून एमएससी एन डेव्हलपमेंट स्टडीजचे शिक्षण् पूर्ण केले. लंडन येथील शिक्षणादरम्यान त्यांनी उच्च शिक्षण आणि असमानता या विषयावर संशोधन केले आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्वीडीश इन्स्टिट्यूट व जर्मन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट येथील फेलो म्हणून पण निवडले होते. इतकेच नव्हे तर मागच्या वर्षी प्रतिष्ठीत अशा फोब्र्स मासिकाने सुद्धा त्यांना ३० प्रतिष्ठीत युवकाच्या यादीत समावेश केला होता.