लोकसत्ता टीम

नागपूर: नागपुरातील एका पुस्तक व्यावसायिकाची मुंबई व नवामोंढा येथील पाच जणांनी १ कोटी रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणात गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गोविंद बालाजी कोंडावार (२४), सुप्रिया बालाजी कोंडावार (५०), बालाजी कोंडावार (५५) तिघेही रा. कोंडावर बुक्स हाऊस, बालाजी मंदिर समोर, नवामोंढा आणि सुशील अंबिकाप्रसाद दुबे (४३), प्रियम्बडा सुशील दुबे (३४) दोघेही रा. ए / ३०७ चितौडगड बिल्डींग, अंबे माता मंदिर जवळ, खरीगांव, भाईंदर, मुंबई (पु.) असे आरोपींचे नाव आहे. तर पंकजसिंग जितसिंग (४८) रा. हजारी पहाड असे फिर्यादीचे नाव आहे.

आणखी वाचा-चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

पोलिसांच्या माहितीनुसार, पंकजसिंग जितसिंग हे सेल्स इंटनॅशनल वितरक सीडीआय बुक्स पब्लिकेशनचे मालक असून ते बुक सप्लायचा व्यवसाय करतात. १ जानेवारी २०२३ ते ३१ जुलै २०२३ दरम्यान आरोपींनी संगनमत करून त्यांच्या पुस्तकांची मागणी केली. त्यानुसार त्यांनी पुस्तकांचा पुरवठा केल्यावरही त्यांचे १ कोटी ५ लाख ४५ हजार ७९४ रुपये थकवण्यात आले.