नागपूर : शेतीत विविध प्रयोग केल्यास त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेणे शक्य आहे. फक्त गरज आहे कल्पकतेची आणि कष्ट करण्याची. ही किमया साधली एका उच्च शिक्षित शेतकऱ्याने. पाच एकराच्या शेतीत दहा लाखांचे आंब्याचे उत्पन्न घेऊन.

हेही वाचा – अकोला परिमंडळात वीजचोरांना महावितरणचा शॉक; ९२ जणांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल

design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…
Independent rehabilitation system for mentally ill patients Mumbai print news
मानसिक आजारमुक्त रुग्णांसाठी स्वतंत्र पुनर्वसन व्यवस्था!

नागपुरात सध्या आंबा महोत्सव सुरू आहे. फळबाग शेतीचे महत्त्व ओळखून तुमसर तालुक्यातील चांदपूर येथील शेतकरी दिलीप लांजे यांनी फळबाग शेती करण्याचे ठरविले. लांजे हे मागील ३३ वर्षांपासून आपल्या ५ एकर शेतामध्ये आंबा लागवड करून १० लाखांचे वार्षिक उत्पादन घेत आहे. ते वनस्पती शास्त्र विषयात पदवीधर आहे. परंतु नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेती करण्याचे ठरविले. त्यांच्याकडे १७ एकर शेती आहे. ते ५ एकर शेतामध्ये आंब्याचे फळपीक घेतात. या पाच एकरमध्ये ते लंगडा व दशेरी या जातीचे आंबे पिकविता. याशिवाय त्यांच्या शेतामध्ये चवसा, केशर, फजली, तोतापली, अशी वेगवेगवेगळ्या जातीची जवळपास सव्वादोनशे झाडे त्यांनी लावली आहे.