नागपूर : चालू आर्थिक वर्षांसाठीचा संपूर्ण मालमत्ता कर आगाऊ स्वरूपात ३० जून २०२२ पर्यंत जमा करणाऱ्या मालमत्ताधारकास (शासनाचे कर वगळून) १० टक्के सवलत दिली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१ जुलै २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत चालू आर्थिक वर्षांसाठी असलेले संपूर्ण मालमत्ता कर आगाऊ स्वरूपात महापालिका निधीत जमा करणाऱ्या मालमत्ताधारकास शासनाचे कर वगळून  ५ टक्के सवलत दिली जाईल. जास्तीत जास्त नागरिकांनी महापालिकेच्या या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 per cent relief property tax opportunity citizens till june 30 ysh
First published on: 29-06-2022 at 01:28 IST