नागपूर : नागनदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून घरातील चिखल काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्यात येईल, तसेच नुकसानीसंदर्भात पंचनाम्याला दुपारी सुरुवात करून तत्काळ मदत देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली.

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चार तासांत जोरदार पावसामुळे अंबाझरी परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे अन्नधान्यसह इतर साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केली. डागा लेआउट, कार्पोरेशन कॉलनी, शंकर नगरसह इतर वस्त्यांना भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला. तसेच घरात चिखलामुळे झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – नागपूर : पावसाचे वाढते पाणी अन मृत्यू समोर… घरातच बुडाली आजारी महिला

सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले असून, या नुकसानीसंदर्भात नागरिकांना संपूर्ण मदत करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. झालेल्या नुकसानीसंदर्भात नागरिकांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. जास्तीत जास्त मदत करण्याची ग्वाही यावेळी फडणवीस यांनी दिली. नाग नदीला आलेल्या पुराची तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटनेची संपूर्ण माहिती यावेळी त्यांनी घेतली. काही तासांत १०९ मिलीमीटर एवढा पाऊस झाला असून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नदीचे पात्र कमी पडल्यामुळे इतर वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यापुढे अशी घटना घडणार नाही याची दखल घेण्यात आली असून पाण्याचा प्रवाह कुठेही थांबणार नाही, या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येईल, असेही नागरिकांना त्यांनी सांगितले.

पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे सर्वत्र चिखल साचला आहे. तसेच घरातील चिखल काढण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्वांना क्लोरीनच्या गोळ्या देण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिले.

हेही वाचा – हवामान खात्याचे अंदाज का चुकतात? अत्याधुनिक यंत्रणा असूनही उपयोग…

उपमुख्यमंत्र्यांनी सकाळी अंबाझरी तलाव, नाग नदी तसेच कार्पोरेशन कॉलनी डागा लेआउट शंकर नगर आधी सर्व भागांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी माजी महापौर संदीप जोशी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Story img Loader