scorecardresearch

नागपूर : जिवंत विद्युत तारा पडून ११ दुभत्या जनावरांचा मृत्यू

जनावरांना बाजारगाव परिसरातील अग्रवाल पेपर मिलच्या पाठीमागे पडीक शेतावर नेत होते,

नागपूर : जिवंत विद्युत तारा पडून ११ दुभत्या जनावरांचा मृत्यू
( जिवंत विद्युत तारा पडून ११ दुभत्या जनावरांचा मृत्यू )

बाजारगाव परिसरातील अग्रवाल पेपर मिल यांच्या यांच्या पडीक जागेवर जनाव तहरांना चराई करण्यासाठी नेले असता रविवारी त्यांच्या अंगावर जिवंत विद्युत तार पडून ११ जनावरांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जनावर गंभीर जखमी झाले.

आज सकाळी अकराच्या सुमारास बाजारगाव येथील खेमाजी सोनबाजी धारोकर (६५) हे नेहमीप्रमाणे आपल्या जनावरांना बाजारगाव परिसरातील अग्रवाल पेपर मिलच्या पाठीमागे पडीक शेतावर नेत होते, परंतु आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे विद्युत खांब पडले. २२० केव्हीच्या जिवंत तार जमिनीवर तुटून पडल्या व लगतच चरत असलेले अकरा जनावरे ठार झाली. यामध्ये सहा म्हैस, चार गाई व एक वासरू यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जनावर गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती बाजारगाव विद्युत विभागाला देण्यात आली. त्यांनी विद्युत प्रवाह बंद करून घटनास्थळ गाठले. घटनेची माहिती मिळातच काँग्रेसे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी घटनास्थळ गाठले.

पोलीस, विद्युत विभाग व महसूल विभाग आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तातडीने पंचनामा करण्याची विनंती केली. घटनास्थळी अनिल पाटील, मंगेश चोखांद्रे, तुषार चौधरी (सरपंच बाजारगाव) प्रकाश भोले (उपसरपच), मंगेश भड, विजय चौधरी (सरपंच सातनवरी) पोहोचले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या