scorecardresearch

बुलढाणा: ‘श्रीं’ ची देखणी आरास ठरली लक्षवेधी; शेगावमध्ये ११६ दिंड्यांना भजनी साहित्य वाटप

शेगाव संस्थानच्या वतीने १२९ वा रामनवमी महोत्सव पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला.

Ram Navami festival celebrated
‘श्रीं’ ची देखणी आरास ठरली लक्षवेधी

दीड लाख भाविकांना महाप्रसाद वितरण

शेगाव संस्थानच्या वतीने १२९ वा रामनवमी महोत्सव पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. शेगावसह राज्यातील सात शाखांवर तब्बल दीड लाख भाविकांना आज महाप्रसाद वितरण करण्यात आले. तसेच ११६ नवीन दिंड्यांना भजनी साहित्याचे वाटप करण्यात आले.शेगाव संस्थानच्या पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपा सरोवर, ओंकारेश्वर आणि गिरडा (जिल्हा बुलढाणा) या शाखांमध्ये ही श्रीरामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. या सर्व शाखांवर मिळून दीड लाख भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आले.

हेही वाचा >>>VIDEO:धावती रेल्वेगाडी पकडण्याच्या नादात महिला पडली, मग मुलीनेही धावत्या गाडीतून उडी मारली; दैव बलवत्तर म्हणून…

संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने ही माहिती देण्यात आली. तसेच राज्यातून शेगावात आलेल्या ८३६ पैकी निकषांची पूर्तता करणाऱ्या ११६ नवीन दिंड्यांना वीणा, टाळ, मृदुंगासह धार्मिक ग्रंथांचे वाटप करण्यात आले.दिंड्यांसह आलेल्या ३१ हजार ४७४ वारकऱ्यांची व्यवस्था ‘विसावा’ भक्तीनिवास येथे करण्यात आली. संध्याकाळी श्रींच्या रजत मुखवट्याच्या पालखीची नगर परिक्रमा काढण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 18:27 IST

संबंधित बातम्या