लोकसत्ता टीम

यवतमाळ: पुसद तालुक्यातील कातखेडा येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावीच्या परीक्षा केंद्रावर बारावीच्या भौतिकशास्त्र पेपरच्या वेळी सामूहिक कॉपीसह गैरव्यवहार आढळून आला. या प्रकाराची शिक्षण मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. या परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालकांसह तीन वर्गावरील आठ पर्यवेक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या सविचांनी दिल्याने शैक्षणिक वतुर्ळात खळबळ उडाली आहे. पुसद तालुक्यात शासनाच्या कॉपीमुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडाला आहे.

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Assistant police officers son succeeds in UPSC examination
पिंपरी : सहायक फौजदाराच्या मुलाची ‘यूपीएससी’ परीक्षेत यशाला गवसणी
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Submerged area of proposed Poshir Dam soil survey to start soon
प्रस्तावित पोशीर धरणाच्या बुडित क्षेत्र, माती सर्वेक्षणाला लवकरच प्रारंभ

आणखी वाचा- खामगावात ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट’ केंद्राला मान्यता, कोलकाता केंद्राच्या धर्तीवर होणार उभारणी; जखमी वन्यप्राण्यांवर होणार उपचार

कातखेडा येथील परीक्षा केंद्रावर २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेवेळी उपविभागीय अधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली. त्यावेळी त्यांना प्रत्येक वर्गखोलीत पेपर सुरू असलेल्या विषयांच्या गाईड, मोबाईल फोन तसेच पेपरमधील प्रश्नांच्या उत्तरांच्या झेरॉक्स आढळून आल्या होत्या. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या तपासणी पथकाने या प्रकाराची गंभीर दखल घेत हा प्रकार थांबविण्याचे आदेश परीक्षा केंद्र संचालकांना दिले. या संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा करून या पथकाने आपला अहवाल अमरावती विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठविला.

आणखी वाचा- महा-होळीने सैलानी बाबा महायात्रेस प्रारंभ; देशभरातील सर्वधर्मीय लाखांवर भाविक दाखल

या अहवालाची गंभीर दखल घेत शिक्षण मंडळाने पुसद पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले. परीक्षा केंद्रावरील गैरव्यवहार प्रकरणी संबंधित परीक्षा केंद्राचे संचालक आणि तीन वर्गातील पर्यवेक्षकांवर फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण मंडळाकडून प्रात्प झाल्याची माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे यांनी दिली आहे. या प्रकरणी ९ मार्च रोजी शिक्षण मंडळात विभागीय सचिवांसमोर सुनावणी होणार असून त्यात होणाऱ्या निर्णयानुसार दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सुत्रांनी दिली.